भाजपची आता 'मेरा परिवार भाजप परिवार' मोहीम

वृत्तसंस्था
Tuesday, 12 February 2019

देशभरातील भाजप कार्यकर्त्यांनी या मोहिमेत सहभागी होऊन आपल्या घरावर किंवा गाडीवर भाजपचे चिन्ह असलेला झेंडा किंवा स्टीकर्स लावले. अहमदाबादमध्ये भाजप कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात अमित शहा यांच्यासह गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी हेही उपस्थित होते.

अहमदाबाद : भाजपने आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचार मोहीम सुरु केली असून, आज (मंगळवार) पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी भाजपचा झेंडा रोवून 'मेरा परिवार भाजप परिवार' मोहीमेला सुरवात केली.

देशभरातील भाजप कार्यकर्त्यांनी या मोहीमेत सहभागी होऊन आपल्या घरावर किंवा गाडीवर भाजपचे चिन्ह असलेला झेंडा किंवा स्टीकर्स लावले. अहमदाबादमध्ये भाजप कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात अमित शहा यांच्यासह गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी हेही उपस्थित होते. भाजपने आगामी लोकसभा निवडणुकीसाठी प्रचार सुरु केला असून, अब की बार फीर मोदी सरकार असा नारा दिला आहे. तसेच विविध माध्यमांतून भाजप प्रचार करत आहे.

2014 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे मुख्य प्रचार अस्त्र असलेल्या सोशल मिडीयातून भाजपने विविध मोहिमांद्वारे प्रचारास सुरवात केली आहे. भाजपने ट्विटरवर आज 'मेरा परिवार भाजप परिवार' ही मोहीम सुरु करत प्रत्येक कार्यकर्त्याला आवाहन केले आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आपल्या गाडीवर भाजपचे स्टीकर चिटकविले. तर इतर मंत्र्यांनीही या मोहिमेत सहभाग नोंदविला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP President Amit Shah launched Mera Parivar Bhajapa Parivar campaign from Ahmedabad