स्वाईन फ्लूमुळे अमित शहांचे मिशन महाराष्ट्र रद्द

वृत्तसंस्था
सोमवार, 21 जानेवारी 2019

शहा यांना स्वाईन फ्लू झाल्याने त्यांना आठवडाभर दिल्लीतल्या 'एम्स'मध्ये उपचारासाठी दाखल रहावं लागलं होतं. त्यामुळे त्यांच्या सर्व कार्यक्रमांमध्ये बदल झाले आहेत. यामुळे एकूणच स्वाईन फ्लूमुळे अमित शहांचे मिशन महाराष्ट्र रद्द झाल्याची चर्चा सध्या आहे.

नवी दिली- भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांचा कोल्हापूर आणि सांगलीचा दौरा रद्द झाला आहे. शहा हे 24 जानेवरीला सांगली आणि कोल्हापूर दौऱ्यावर येणार होते. मात्र, शहा यांना स्वाईन फ्लू झाल्याने त्यांना आठवडाभर दिल्लीतल्या 'एम्स'मध्ये उपचारासाठी दाखल रहावं लागलं होतं. त्यामुळे त्यांच्या सर्व कार्यक्रमांमध्ये बदल झाले आहेत. यामुळे एकूणच स्वाईन फ्लूमुळे अमित शहांचे मिशन महाराष्ट्र रद्द झाल्याची चर्चा सध्या आहे.

अमित शहा महाराष्ट्रातल्या नेत्यांनाही भेटणार होते. मात्र त्यांच्या सर्वच कार्यक्रमांची फेररचना झाल्याने हा दौरा पुढे ढकलण्यात आला आहे. मात्र मंगळवारी होणाऱ्या त्यांच्या पश्चिम बंगालच्या दौऱ्यात कुठलाही बदल करण्यात आला नाही. 

दरम्यान, अमित शहा यांना 16 जानेवारीला स्वाईन फ्लूची लागण झाली होती. त्याची माहिती खुद्द शहा यांनी टि्वटरवर दिली होती. 'मला स्वाईन फ्लूची लागण झाली असून उपचार सुरू आहे. देवाची कृपा आणि तुमच्या सगळ्याच्या प्रेमामुळे मी लवकरच बरा होईल', असं शहा यांनी टि्वटकरून सांगितलं होतं. यानंतर त्यांना उपचारानंतर रुग्णालयातून घरीही सोडण्यात आले आहे.

Web Title: BJP president Amit Shahs Maharastra visit cancelled