ममता बॅनर्जींचे दुसरे नाव असहिष्णुता; जे.पी. नड्डा यांची टीका

पीटीआय
Thursday, 10 December 2020

असहिष्णुतेचे दुसरे नाव हे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आहे.त्यांच्या धोरणामुळे बंगालमध्ये असहिष्णुतेचे वातावरण वाढले आहे.त्याचवेळी तृणमूल सरकार अल्पसंख्यांकांचे लांगूलचालन करत असल्याचा आरोप त्यांनी केला.

कोलकता - ममता बॅनर्जी याचा दुसरा अर्थ असहिष्णुता आहे, अशी टीका भाजपचे अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी केली. आगामी पश्‍चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत भाजपला २०० हून अधिक जागा मिळतील, असा विश्‍वास नड्डा यांनी या वेळी व्यक्त केला. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा पश्‍चिम बंगालच्या दोन दिवसाच्या दौऱ्यावर आहेत. आज पहिल्या दिवशी त्यांनी राज्यातील ९ जिल्हा कार्यालयाचे उदघाटन केले. त्यानंतर बोलताना नड्डा यांनी सत्ताधारी तृणमूल कॉंग्रेस आणि अन्य पक्षांवर घराणेशाहीच्या राजकारणाचा आरोप केला.

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

भाजपसाठी मात्र पक्ष हा कुटुंबासारखा आहे, असे ते म्हणाले. आपल्याला श्‍यामा प्रसाद मुखर्जी यांच्या सहिष्णुतेची आणि शिस्तीची आठवण येत आहे. पण सध्या बंगालमध्ये याउलट स्थिती आहे. असहिष्णुतेचे दुसरे नाव हे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आहे. त्यांच्या धोरणामुळे बंगालमध्ये असहिष्णुतेचे वातावरण वाढले आहे. त्याचवेळी तृणमूल सरकार अल्पसंख्यांकांचे लांगूलचालन करत असल्याचा आरोप त्यांनी केला. जेव्हा संपूर्ण देश अयोध्येतील राम मंदिराच्या भूमिपूजनाचा सोहळा पाहत होता, तेव्हा ममता बॅनर्जी यांनी ५ ऑगस्टला बंगालमध्ये लॉकडाउन लागू केला. त्यामुळे स्थानिक नागरिकांना या क्षणाचा आनंद व्यक्त करता आला नाही. याउलट ३१ जुलै रोजी बकरी ईदच्या दिवशी लॉकडाउन मागे घेण्यात आला होता. यावरून ममता सरकारचा दृष्टीकोन कळतो, असे नड्डा म्हणाले.२०२१ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपला २०० हून अधिक जागा मिळतील आणि तृणमूलचा सुफडासाफ होईल, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला. 

मोदी सरकारलाच घ्यावी लागेल माघार, शेतकरी हटणार नाहीत- राहुल गांधी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP president J.P. Nadda criticizes Chief Minister of West Bengal Mamata Banerjee