भाजप अध्यक्षांनी शेअर केला सोनिया गांधींचा व्हिडिओ; काँग्रेसवर साधला निशाणा

jp nadda sonia gandhi
jp nadda sonia gandhi

नवी दिल्ली - शेतकऱ्यांच्या आंदोलनाला शुक्रवारी एक महिना पूर्ण झाला तरी अद्याप चर्चेच्या फेऱ्या सुरुच आहेत. यातच काँग्रेस आणि भाजप यांच्याकडून एकमेकांवर आरोप केले जात आहेत. काँग्रेस सातत्याने भाजपवर टीका करत असून आता भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचा एक जुना व्हिडिओ ट्विट केला आहे.

जेपी नड्डा यांनी व्हिडिओ ट्विट करून म्हटलं की, काँग्रेस शेतकऱ्यांची कशी दिशाभूल करत आहे. नड्डांनी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये सोनिया गांधी एका सभेत बोलताना दिसतात. यात  सोनिया गांधी विचारतात की, शेतकऱ्यांना दलालांच्या तावडीतून सोडवून मालाला चांगली किंमत मिळवून द्यायला हवी की नको? हा व्हिडिओ ट्विट करून नड्डा यांनी सांगितलं की,  शेतकऱ्यांच्या मुद्द्यांवर काँग्रेसचा खरा चेहरा पुन्हा समोर आला आहे. 

जेपी नड्डा म्हणाले की, शेतकऱ्यांची दिशाभूल करणाऱ्या आणि त्यांच्या हक्कांपासून वंचित ठेवणाऱ्या काँग्रेसचं सत्य समोर आलं आहे. सोनिया गांधी पहिल्यांदा शेतकऱ्यांना दलाल मुक्त बाजाराची वकिली करत होत्या. मात्र आता विरोध करत आहेत. ही आहे काँग्रेसची संधीसाधू विचारसरणी, कमी माहिती आणि पुन्हा पुन्हा आपल्या वक्तव्याविरोधात वागत असल्याचं यातून दिसतं. 

भाजपकडून सतत हा आरोप केला जात आहे की, काँग्रेस शेतकऱ्यांची दिशाभूल करत आहे. त्यांना आंदोलन करण्यास भाग पाडत आहे. शेतकरी आंदोलनाच्या मुद्द्यावर गुरुवारी राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली राष्ट्रपती भवनावर मोर्चा काढण्यात आला. मात्र पोलिसांनी तो थांबवून प्रियांका गांधींसह काँग्रेस नेत्यांना ताब्यात घेण्यात आलं होतं. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com