एका घराण्याचे हित हे भारताचे हित होऊ शकत नाही; भाजपचा काँग्रेसवर जोरदार पलटवार 

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 24 June 2020

सत्तेतून सातत्याने नाकारलेले व झिडकारलेले एक घराणे देशातील तमाम व संपूर्ण विरोधी पक्षांचे प्रतिनिधित्व करू शकत नाही, एका घराण्याचे हित हे भारताचे हित होऊ शकत नाही, असं म्हणत भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी काँग्रेसवर पलटवार केला आहे.

नवी दिल्ली- सत्तेतून सातत्याने नाकारलेले व झिडकारलेले एक घराणे देशातील तमाम व संपूर्ण विरोधी पक्षांचे प्रतिनिधित्व करू शकत नाही, एका घराण्याचे हित हे भारताचे हित होऊ शकत नाही, असं म्हणत भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी काँग्रेसवर पलटवार केला आहे. नड्डा यांनी यासंदर्भात ट्विट केलं आहे.

भारत-चीन सीमासंघर्ष सुरू झाल्यानंतर काँग्रेस नेते आणि केरळमधील वायनाडचे खासदार राहुल गांधी सातत्याने भारताच्या पंतप्रधानांवर ट्विटरद्वारे शाब्दिक हल्ले करीत आहेत. त्यात ते ‘सरेंडर’सारख्या शब्दांचे स्पेलिंगच्या चुकादेखील करत आहेत. सीमेवर भारतीय सैनिकांना शस्त्रे न घेता का पाठवले, या त्यांच्या प्रश्नांना देशाच्या माजी संरक्षणमंत्र्यांनीच सर्वपक्षीय बैठकीत सूचक प्रत्युत्तर दिले होते. 

रामदेवबाबांनी आणलेलं कोरोनावरील औषध निघालं साध्या सर्दी-खोकल्याचं!
गांधी यांनी आत्तापर्यंत किमान १७ ट्विट केली आहेत. या पार्श्वभूमीवर जे. पी. नड्डा विलक्षण आक्रमक झाले असून, ते काँग्रेसच्या राजघराण्यावर हल्ले करत आहेत. नड्डा यांनी म्हटले की, सारा देश चिनी संकटाच्यावेळी एकजूट आणि आमच्या सशस्त्र दलांच्या बरोबर उभा आहे. फक्त एका घराण्याला याबाबत समस्या आहेत. यांच्या राजकुमाराला ‘लाँच’ करण्याचे अगणित प्रयत्न अपयशी ठरल्यानंतर आता हे देशाच्या सैन्याचे मनोबल खच्ची करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. या घराण्याला आणि त्याच्या राजनिष्ठ आणि एकनिष्ठ दरबारींना आपण म्हणजेच देशातील तमाम सर्व विरोधी पक्ष आहोत, असा भ्रम झालेला दिसतो. त्यातूनच त्यांनी भारत-चीन सीमावादासंदर्भात अनेक असत्य पसरवण्याचा प्रयत्न केला आणि आजही करीत आहेत. 

सहकारी बँकांबद्दल मोदी सरकारने घेतला मोठा निर्णय
नड्डा यांनी आज लागोपाठ केलेल्या ट्विटमध्ये म्हटले की, आज संपूर्ण विरोधी पक्ष सरकारच्या बरोबर उभा आहे. फक्त एका घराण्याला त्याबाबत समस्या व शंका आहेत. सरकारला प्रश्न विचारणे हेच विरोधकांचे काम असते आणि नुकत्याच झालेल्या सर्वपक्षीय बैठकीतही ते दिसून आले. अनेक राजकीय पक्षांनी सरकारला चीन संकटाबाबत अतिशय विधायक सूचना केल्या. अपवाद फक्त एका घराण्याचा! माहिती आहे का कोण, अशा खोचक प्रश्नाने नड्डा यांनी आपली आज सकाळची ट्विट मालिका संपविली. 

बँकांच्या नियमात होणार मोठे बदल; आता एक जुलैपासून...
दरम्यान, भारत आणि चीनमधील सैनिकांमधील रक्तरंजित संघर्षामध्ये भारताचे 20 जवान शहीद झाले होते. या मुद्द्यावरुन विरोधी पक्षांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली होती. विशेष करुन काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदी यांना धारेवर धरले होते. या पार्श्वभूमीवर भाजपनेही काँग्रेसला प्रत्युत्तर देणे सुरु केले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bjp pressident jp nadda criticize congress mp rahul gandhi