भाजपला यूपीतून पळवून लावू - लालूप्रसाद यादव

पीटीआय
रविवार, 6 नोव्हेंबर 2016

लखनौ - आम्ही उत्तर प्रदेशात समाजवादी पक्ष मजबूत करण्यासाठी येथे आलो आहोत. शहरातून लबाड कोल्ह्याला जसे पळवून लावतो, तसे बिहारमधून भाजपला पिटाळून लावले. त्याचपद्धतीने उत्तर प्रदेशमधून भाजपला पळवून लावू, असे आज राजदचे सर्वेसर्वा लालूप्रसाद यादव म्हणाले. समाजवादी पक्षाच्या रौप्यमहोत्सवानिमित्त आयोजित सोहळ्यात ते बोलत होते.

लखनौ - आम्ही उत्तर प्रदेशात समाजवादी पक्ष मजबूत करण्यासाठी येथे आलो आहोत. शहरातून लबाड कोल्ह्याला जसे पळवून लावतो, तसे बिहारमधून भाजपला पिटाळून लावले. त्याचपद्धतीने उत्तर प्रदेशमधून भाजपला पळवून लावू, असे आज राजदचे सर्वेसर्वा लालूप्रसाद यादव म्हणाले. समाजवादी पक्षाच्या रौप्यमहोत्सवानिमित्त आयोजित सोहळ्यात ते बोलत होते.

लखनौ येथील ज्ञानेश्‍वर मिश्र पार्क आयोजित सोहळ्यात माजी पंतप्रधान एच. डी. देवगौडा यांनी महाआघाडीबाबत प्रश्‍न उपस्थित केला, तेव्हा यादव म्हणाले, की उत्तर प्रदेश, गुजरात आणि पंजाबमध्ये निवडणुकीनंतर अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते. सध्या आम्ही समाजवादी पक्षाच्या आमंत्रणावरून येथे आलो आहोत. उत्तर प्रदेशात महाआघाडी निश्‍चित होईल आणि या आघाडीचाच विजय होईल, असा विश्‍वास व्यक्त केला. समाजवादी परिवारातील मतभेदांबाबत लालू म्हणाले, की सर्व मतभेद आता मिटले आहेत. आता कोणतेच मतभेद राहिलेले नाहीत. परिवार एकच आहे.

जेडीयूनेचे नेते शरद यादव म्हणाले, की समाजवादी पक्षाशी आपले जुने संबंध असल्याने आज सोहळ्यात सहभागी झालो आहोत. महाआघाडीवरून अद्याप कोणतीही चर्चा झालेली नाही. याबाबत मुलायमसिंह अधिक चांगले सांगू शकतील. कारण समाजवादी पक्ष हा उत्तर प्रदेशातील मोठा पक्ष आहे.

धर्मांध शक्तींच्या विरोधात एकत्र यावे - देवगौडा
देशातील धर्मांध शक्तींच्या विरोधात जनता परिवारातील नेत्यांनी एकत्र येण्याची गरज असल्याचे प्रतिपादन माजी पंतप्रधान एच. डी. देवगौडा यांनी केले. समाजवादी पक्ष हा धर्मांध शक्तींना रोखणारा महत्त्वाचा पक्ष आहे. ज्येष्ठ नेते मुलायमसिंह यादव, लालूप्रसाद यादव, शरद यादव यांनी एकत्र येण्याची गरज असून, देशातील जातीय शक्तींना रोखण्याचे काम करायला हवे. समाजवादी पक्षाच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. मुलायमसिंह यादव यांच्या नेतृत्वाखाली धर्मनिरपेक्ष शक्ती नक्कीच एकत्र येतील, असा विश्‍वास देवगौडा यांनी व्यक्त केला. आपल्या दहा महिन्यांच्या कार्यकाळात शेजारी राष्ट्रांशी संबंध चांगले होते. माझ्या पंतप्रधानपदाच्या काळात आणि मुलायमसिंह संरक्षणमंत्री असताना देशाच्या सीमा सुरक्षित होत्या. या काळात काश्‍मीरमध्ये कोणतीही अप्रिय घटना घडली नाही आणि तेथे जमावबंदी आदेशही लागू करण्याची गरज पडली नाही. आज पुन्हा एकदा विरोधी पक्षाची ताकद आणखी मजबूत करण्याची वेळ आली असल्याचे देवगौडा म्हणाले.

आम्ही उत्तर प्रदेशात समाजवादी पक्ष मजबूत करण्यासाठी येथे आलो आहोत. शहरातून लबाड कोल्ह्याला जसे पळवून लावतात, तसे आम्ही बिहारमधून भाजपला पिटाळून लावले. त्याचपद्धतीने उत्तर प्रदेशमधून भाजपला पळवून लावू. उत्तर प्रदेश, गुजरात आणि पंजाबमध्ये निवडणुकीनंतर अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते. सध्या आम्ही समाजवादी पक्षाच्या आमंत्रणावरून येथे आलो आहोत. उत्तर प्रदेशात महाआघाडी निश्‍चित होईल आणि या आघाडीचाच विजय होईल.
- लालूप्रसाद यादव, "राजद'चे सर्वेसर्वा

देशातील धर्मांध शक्तींच्या विरोधात जनता परिवारातील नेत्यांनी एकत्र येण्याची गरज आहे. समाजवादी पक्ष हा धर्मांध शक्तींना रोखणारा महत्त्वाचा पक्ष आहे. मुलायमसिंह यादव, लालूप्रसाद यादव, शरद यादव यांनी एकत्र येण्याची गरज असून, देशातील जातीय शक्तींना रोखण्याचे काम करायला हवे. मुलायमसिंह यांच्या नेतृत्वाखाली धर्मनिरपेक्ष शक्ती नक्कीच एकत्र येतील, आज पुन्हा एकदा विरोधी पक्षाची ताकद आणखी मजबूत करण्याची वेळ आली आहे.
- एच. डी. देवेगौडा, माजी पंतप्रधान

Web Title: BJP put away up by laluprasad yadav