भाजपकडून उत्तरप्रदेश, बिहार विधान परिषदेसाठी उमेदवारांची यादी जारी

वृत्तसंस्था
रविवार, 15 एप्रिल 2018

पक्षाकडून उत्तरप्रदेशसाठी 10 तर बिहारसाठी 3 जणांना उमेदवारी देण्यात आली. या दोन्ही राज्यातील विधान परिषदेतील सदस्यांचा कार्यकाळ संपत असल्याने या भागात निवडणुका घेण्यात येणार आहेत.

नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाकडून उत्तरप्रदेश आणि बिहार या राज्यात होणाऱ्या विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी उमेदवारांची यादी आज (रविवार) जारी करण्यात आली. पक्षाकडून उत्तरप्रदेशसाठी 10 तर बिहारसाठी 3 जणांना उमेदवारी देण्यात आली. या दोन्ही राज्यातील विधान परिषदेतील सदस्यांचा कार्यकाळ संपत असल्याने या भागात निवडणुका घेण्यात येणार आहेत.

voting india

उत्तरप्रदेश विधान परिषदेच्या या यादीमध्ये समाजवादी पक्षातून भाजपमध्ये आलेले बुक्कल नवाब आणि सरोजनी अग्रवाल यांना उमेदवारी देण्यात आली. तर बिहारमध्ये भाजपकडून उपमुख्यमंत्री सुशील मोदी, आरोग्यमंत्री मंगल पांडे आणि माजी केंद्रीय मंत्री डॉ. संजय पासवान यांना उमेदवारी देण्यात आली आहे. 

  

Web Title: BJP release list of candidate of MLC election in uttar pradesh and bihar

टॅग्स