मोदींच्या वाढदिनी भाजपची डिजिटल मोहीम; दहा लाख व्हिडिओतून देणार शुभेच्छा

modi birthday
modi birthday

नवी दिल्ली - भाजपाचे सगळे केंद्रीय मंत्री, मंत्री, मुख्यमंत्री, खासदार आणि स्थानिक नेते सध्या एक अनोखे असे लक्ष गाठण्यात व्यस्त असल्याचे दिसून येत आहे. येत्या १७ सप्टेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदींचा वाढदिवस आहे. त्या पार्श्वभूमीवर तब्बल दहा लाख लोकांकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा देणाऱ्या व्हिडीओच्या माध्यमातून मोदींचा वाढदिवस साजरा करण्याचा भाजपचा मानस आहे. 

मोदींच्या वाढदिवसाला फक्त एक आठवडा बाकी आहे. या पार्श्वभूमीवर भाजपाचा आयटी सेल कंबर कसून कामाला लागला आहे. एका डिजीटल मोहीमेच्या माध्यमातून जास्तीसजास्त लोकांपर्यंत पोहचून दहा लाख लोकांकडून शुभेच्छांचे व्हिडीओ मिळवण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरु आहेत. 

व्हिडीओचे स्वरुप काय?
 #HappyBirthdayModiji या हॅशटॅगचा वापर करुन हे व्हिडीओ प्रसारित होणार आहेत. मोदींना फक्त शुभेच्छाच नव्हे तर त्यांच्या 
नेतृत्वामुळे  भारतात कसा आमुलाग्र बदल झाला आहे, त्यांच्या नेतृत्वामुळे देशात कसे आशादायी आणि सकारात्मक बदल झाले आहेत याबद्दलही लोकांना बोलण्यासाठी सांगितले जात आहे. 

आयटी सेलला काय अपेक्षित आहे?
- व्हिडीओमध्ये विविधतेत एकता दिसायला हवी. 
- वेगवेगळ्या प्रांतातले, धर्माचे, जातीचे, वयाचे आणि भाषेचे लोक या मोहीमेत सहभागी होतील
- भाषा वेगळी असली तरीही त्यातून एकच संदेश जायला हवा तो म्हणजे, प्रत्येकजण मोदींवर प्रेम करतो. 

कसं सुरु आहे प्लॅनिंग?
भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या इच्छेनुसार हे सगळं केले जात आहे, हे म्हणणं एका वरिष्ठ नेत्याने फेटाळून लावले. हि कल्पना वरुन आलेली नाही. व्हिडीओ बनवण्यासाठी कुणावरही दबाव नाहीये. खरं तर हे पंतप्रधानांना माहितदेखील नाहीये. हे केवळ त्यांच्यावरच्या प्रेमापोटी उत्स्फूर्तपणे घडत आहे. असंही या नेत्यांनी सांगितले. 

हे सगळी मोहीम घडवून आणताना कोणताही डिजीटल पुरावा मागे राहणार नाही याची काळजी आयटी सेलकडून घेतली जात आहे. मोहीमेबद्दल कसलेही लिखित संदेश, ईमेल केले जात नाहीयत. याबाबतचा बहुतेक संवाद हा व्हॉट्सअ‍ॅप किंवा कॉलद्वारे केले.

कशासाठी?
मोदीजी वाढदिवसाबद्दल इतके उत्सुकही नसतात, कधी कधी त्यांना त्यांचा वाढदिवसही लक्षात नसतो. ते तर सध्या कोरोनाशी लढण्यात व्यस्त आहेत. भारताची अर्थव्यवस्था पुर्ववत करण्यासाठी झगडत आहेत. आम्ही फक्त त्यांना हे जाणवून देऊ ईच्छितो की, आम्ही तुमच्यावर खुप प्रेम करतो, असं या नेत्यांनी म्हटले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com