अन्सारींच्या समावेशाबद्दल मायावतींना भाजपची नोटीस

वृत्तसंस्था
शनिवार, 28 जानेवारी 2017

नवी दिल्ली : गॅंगस्टर मुख्तार अन्सारी आणि त्यांचे बंधू यांचा बहुजन समाज पक्षात (बसप) समावेश केल्याबद्दल भारतीय जनता पक्षाने बसपच्या प्रमुख मायावती यांना कायदेशीर नोटीस पाठविली आहे.

नवी दिल्ली : गॅंगस्टर मुख्तार अन्सारी आणि त्यांचे बंधू यांचा बहुजन समाज पक्षात (बसप) समावेश केल्याबद्दल भारतीय जनता पक्षाने बसपच्या प्रमुख मायावती यांना कायदेशीर नोटीस पाठविली आहे.

स्थानिक कंत्राटदार मन्ना सिंह यांच्या हत्येचे साक्षीदार असलेले भारतीय जनता पक्षाचे नेते अशोक सिंह यांनी ही नोटीस पाठविली आहे. अन्सारीच्या गॅंगने 2009 साली मन्ना सिंह यांची हत्या केली होती. सिंह हे 30 जानेवारी रोजी निवडणूक आयोगाकडेही मायावती यांची तक्रार करणार आहेत. यापूर्वी चार वेळा आमदार असलेले अन्सारी यांना बसपने उत्तर प्रदेशमधील मऊ मतदारसंघातून आगामी विधानसभा निवडणुकीचे उमेदवार म्हणून तिकिट दिल्याचे 26 जानेवारी रोजी जाहीर केले आहे. त्यांच्यावरील आरोप अद्याप सिद्ध झाले नसल्याचा दावा बसपने केला आहे. अन्सारी यांचा पुत्र अब्बास आणि बंधू सिबगतुल्ला यांनीही बहुजन समाज पक्षात प्रवेश केला आहे. अब्बासला घोसी तर सिबगतुल्लाला मोहम्मदाबाद मतदारसंघातून बसपने उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे तिकिट दिले आहे.

अन्सारी हे 1996 साली बसपच्या तिकिटावर निवडून आले होते. ते कृष्णानंद रॉय हत्याप्रकरणातील प्रमुख आरोपी असून सध्या लखनौतील तुरुंगात आहेत. या प्रकरणी आपण निर्दोष असल्याचा दावा ते करत आहेत. मन्नासिंह हत्या प्रकरणातील प्रमुख साक्षीदार राम सिंह मौर्य यांची 2010 साली हत्या करण्यात आली होती. या प्रकरणीही अन्सारीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: BJP sends notice to Mayawati over inclusion of Mukhtar Ansari in BSP