भाजपचे लक्ष्य आता दिल्ली विधानसभा; सुरु केली 'ही' मोहीम

वृत्तसंस्था
शुक्रवार, 3 जानेवारी 2020

संकल्प पत्र एक पवित्र ग्रंथ

- 8 दिवस घेतल्या जाणार सूचना

- 12 जानेवारीला संकल्प पत्र होणार प्रसिद्ध

नवी दिल्ली : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर आता दिल्ली विधानसभा निवडणुकीचे बिगूल वाजणार आहे. त्यानुसार ही निवडणूक जिंकण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे. त्यानुसार सूचना मोहिम सुरु केली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पटपडगंज विधानसभेतील मंडावली येथे आयोजित एका जाहीरसभेत दिल्ली भाजप अध्यक्ष मनोज तिवारी यांनी या मोहिमेबाबतची घोषणा केली. मनोज तिवारी यांनी जाहीरसभेत सांगितले, की शुक्रवारपासून 'मेरी दिल्ली, मेरा सुझाव' (माझी दिल्ली, माझ्या सूचना) मोहीम सुरु केली जात आहे. या मोहिमेंतर्गत आम्ही राज्यातील जनतेला एक क्रमांक देत आहोत. ज्यावर फोन करून आपण याबाबतच्या सूचना देऊ शकता. याच सूचनांच्या आधारे आम्ही पक्षाचा जाहीरनामा तयार करू आणि तेच आमचे वचनपत्रही असेल.

Image result for BJP

संकल्प पत्र एक पवित्र ग्रंथ

आमच्यासाठी आमचे संकल्प पत्र एक पवित्र ग्रंथ आहे. आमच्यासाठी आमचा जाहीरनामा हे गीता आणि कुराण समान आहे, असेही तिवारी यांनी सांगितले.

8 दिवस घेतल्या जाणार सूचना

या मोहिमेंतर्गत 8 दिवसांपर्यंत दिल्लीतील नागरिकांकडून सूचना घेतल्या जाणार आहेत. त्याच सूचनांच्याआधारे 12 जानेवारीला निवडणुकीच्या जाहीरनाम्यात याबाबतची माहिती देण्यात येईल.

Image result for delhi assembly

स्मृती इराणी यांच्याकडून सुरुवात

'मेरी दिल्ली, मेरा सुझाव' ही मोहीम सुरु झाली आहे. मात्र, याची औपचारिक सुरवात शुक्रवारपासून दिल्लीच्या भाजप कार्यालयातून केंद्रीय महिला आणि बालविकासमंत्री स्मृती इराणी यांच्याकडून होणार आहे.

12 जानेवारीला संकल्प पत्र होणार प्रसिद्ध

'मेरी दिल्ली, मेरा सुझाव' या मोहिमेंतर्गत 8 दिवसांपर्यंत दिल्लीतील नागरिकांकडून सूचना घेतल्या जाणार आहेत. त्यानुसार 12 जानेवारीला भाजपकडून संकल्पपत्र जारी करण्यात येणार आहे.

सत्तेची रस्सीखेच आणि नात्याचा जिव्हाळा म्हणजेच धुरळा !


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP started meri delhi mera sujhav campaign for Delhi Assembly Election