Loksabha 2019: भाजपने काढला शपथविधीचा मुहूर्त?

वृत्तसंस्था
रविवार, 19 मे 2019

निवडणुकीआधी एकत्र न आलेले विरोधक पुन्हा एकत्र येण्याची तयारी करत आहेत. तर भाजपने बहुमत मिळणार हे गृहित धरून शपथविधी भव्य आणि ऐतिहासिक होईल याची योजना तयार केली असून शपथविधीचा मुहूर्त काढला असल्याची देखिल चर्चा सूरु आहे.

नवी दिल्ली: निवडणुकीआधी एकत्र न आलेले विरोधक पुन्हा एकत्र येण्याची तयारी करत आहेत. तर भाजपने बहुमत मिळणार हे गृहित धरून शपथविधी भव्य आणि ऐतिहासिक होईल याची योजना तयार केली असून शपथविधीचा मुहूर्त काढला असल्याची देखिल चर्चा सूरु आहे.

23 तारखेला निकाल बाजूने आले तर 26 किंवा 28 मे रोजी शपधविधी होऊ शकतो. 28 मे हा स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जयंतीचा दिवस आहे. त्या दिवशी शपथविधी होऊ शकतो. या समारंभाला विदेशातले बडे पाहुणे निमंत्रित करण्याचीही भाजपची योजना आहे. एखाद्या मुस्लिम देशाच्या प्रमुखालाही निमंत्रित केलं जाऊ शकते अशीही शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

दरम्यान, भाजप आणि मित्रपक्षांना बहुमताचा आकडा गाठता येईल असा विश्वास भाजपने व्यक्त केला असून गरज पडलीच तर काय करायचे याचा आराखडाही भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी तयार केला आहे. पुन्हा एकदा मोदी सरकार येणार हे गृहित धरून भाजपने शपथविधीची तयारीही सुरू केल्याचे सांगण्यात येत आहे. 2014 मध्ये मोदींनी सार्क देशांच्या प्रमुखांना बोलावून मास्टर स्ट्रोक मारला होता. पुन्हा बहुमत मिळालं तर ते ऐतिहासिक घटना ठरणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bjp starts preparation of modi swearing ceremony