उत्तरप्रदेशातील 51 जागांसह भाजपचे बहुमतही जाणार!

उत्तरप्रदेशातील 51 जागांसह भाजपचे बहुमतही जाणार!

नवी दिल्ली-  उत्तरप्रेदशातील 51 जागांसह भारतीय जनता पक्षाचे बहुमत जाणार असल्याचे सर्वेक्षण, भाजपच्या अंतर्गत सर्व्हेनं केले आहे. या सर्वेक्षणाने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांची झोप उडाली आहे.

लोकसभा निवडणूका जवळ येत असतानाच राजकीय पक्षांची बेरीज-बजाबाकी सुरू झाली आहे. सत्ताधारी भाजपनं पुन्हा एकदा आपली ताकद किती हे जाणून घेण्यासाठी अंतर्गत सर्व्हे केला. परंतु या सर्व्हेतून आलेले निष्कर्ष भाजपला धोका सांगणारे आहेत. भाजपला 2014च्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत 2019च्या लोकसभा निवडणुकीत मोठं नुकसान होण्याची शक्यता या सर्वेतून वर्तवण्यात आली आहे. भाजपच्या हिंदी पट्ट्यातील जवळपास सर्वच राज्यांतील जागांमध्ये घट होणार आहे.

विशेष म्हणजे भाजपला उत्तर प्रदेशमध्ये मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे. सर्व्हेनुसार, उत्तर प्रदेशात भाजपाला 51 जागांचं नुकसान होणार आहे. 2014च्या निवडणुकीत भाजपने उत्तर प्रदेशातल्या 80 पैकी 71 जागा जिंकल्या होत्या. परंतु आता सर्व्हेनुसार उत्तर प्रदेशात पक्षाला 20 जागांवरच समाधान मानावं लागणार आहे.

उत्तर प्रदेशात सप-बसपची झालेली आघाडी ही भाजपच्या जागा घटवण्यासाठी निर्णायक ठरणार असल्याचे सर्वेत सांगण्यात आले आहे. सप-बसपने आघाडी करतानाच अमेठी आणि रायबरेलीच्या जागा काँग्रेससाठी सोडल्या आहेत. उर्वरित 38-38 लोकसभा जागांचं वाटप केलं होतं. जागांचं वाटप हे दोन्ही पक्षांचं त्या त्या प्रभागात असलेल्या ताकदीनुसार करण्यात आलं आहे. आता या सर्वेनंतर अमित शहा आणि नरेंद्र मोदी ही जोडी उत्तरप्रदेशात कुठली रणनीती आखणार आणि बहुमत टिकवण्यासाठी काय प्रयत्न करणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com