काश्मीरमध्ये मुफ्ती सरकारच्या सत्तेतून भाजप बाहेर

वृत्तसंस्था
मंगळवार, 19 जून 2018

भारतीय जनता पक्षाने आज(मंगळवार) जम्मू काश्मीरमधील मुफ्ती सरकारच्या सत्तेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. आज भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी त्यांच्या वरिष्ठ नेत्यांची दिल्लीत बैठक घेऊन हा निर्णय घेतला आहे. आज संध्याकाळपर्यंत जम्मू काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती आपला राजीनामा राज्यपालांकडे देतील. भाजपनेही सरकारचे समर्थन मागे घेतल्याचे पत्र राज्यपालांना दिले आहे. 

नवी दिल्ली - भारतीय जनता पक्षाने आज(मंगळवार) जम्मू काश्मीरमधील मुफ्ती सरकारच्या सत्तेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी त्यांच्या वरिष्ठ नेत्यांची दिल्लीत बैठक घेऊन हा निर्णय घेतला आहे. आज संध्याकाळपर्यंत जम्मू काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती आपला राजीनामा राज्यपालांकडे देतील. भाजपानेही सरकारचे समर्थन मागे घेतल्याचे पत्र राज्यपालांना दिले आहे. 

भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते राम माधव यांनी भाजपा सत्तेतून का बाहेर पडण्यामागची कारणे सांगताना म्हटले आहे की, गेल्या काही दिवसांत काश्मीरमधल्या परिस्थितीवर चर्चा झाली. पंतप्रधान मोदी व अमित शाह यांच्याशी चर्चा केल्यानंतर या निर्णपर्यंत आम्ही पोहोचलो आहोत की, काश्मीरमध्ये भाजपा सत्तेत राहू शकत नाही.

तीन वर्षांपूर्वी आम्ही सरकार स्थापन केले होते. विधानसभेच्या निवडुकांमध्ये जम्मूमध्ये भाजपाला तर खोऱ्यामध्ये पीडीपीला बहुमत मिळाले होते. सरकार चालवताना शांती कायम ठेवणं व तिनही प्रांतांचे जम्मू काश्मिर व लडाखचा विकास करणं हे आमचे उद्दिष्ट्य होते. आज मात्र परिस्थिती वेगळीच परिस्थिती निर्माण झाली आहे, दहशतवाद, कट्टरता प्रचंड वाढली आहे. केंद्राने शक्य ती मदत करुनही काहीच उपयोग होताना दिसत नाही. राज्य सरकार व्यवस्थित चालवण्यात पीडीपीला आलेल्या अपयशामुळे आम्ही हा निर्णय घेत आहोत असे माधव यांनी स्पष्ट केले.

हा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी, पक्षाध्यक्ष अमित शहा त्याचबरोबर, राज्यातील महत्वाचे नेते आणि राज्य सरकारमधील आमचे मंत्री या सर्वांशी चर्चा करुनच घेण्यात आलेला आहे. 

जम्मू काश्मीरमधील सध्याचे पक्षीय बलाबल
एकूण जागा - 87
नामनिर्देशिक - 2
पीडीपी - 28
भाजप - 25
काँग्रेस - 12
नॅशनल कॉन्फरन्स - 15
पिपल्स कॉन्फरन्स - 2

Web Title: Bjp Takes Back Support From Pdp