भाजप म्हणते, राहुल गांधींचे जॅकेट 70 हजारांचे 

वृत्तसंस्था
बुधवार, 31 जानेवारी 2018

शिलाँग - मेघालय निवडणुकीच्या काही दिवस आधी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी शिलाँगला पोहोचले. यावेळी पक्षाच्या एका कार्यक्रमात त्यांनी घातलेले जॅकेट हा चर्चेचा विषय झाला आहे. हे जॅकेट सुमारे 70 हजार रूपयांचे आहे. मागच्या वर्षी उत्तराखंड निवडणुकीच्या प्रचारावेळी एका सभेत आपला फाटलेला खिसा दाखवणाऱ्या राहुल गांधींनी इतके महागडे जॅकेट घालण्यावरून भाजपने त्यांना लक्ष केले आहे.

याबाबत भाजपच्या मेघालय शाखेने मंगळवारी ट्विट केले असून, यामध्ये व्यापक भ्रष्ट्राचार करून मेघालयचा सरकारी खजिना लुटल्यानंतर काळ्या पैशातून बनलेले सुटा-बुटाचे सरकार? असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. तसेच आमच्या दु:खावर गाणे गाण्याऐवजी तुम्ही मेघालयच्या नाकर्त्या सरकारचे प्रगती पुस्तक देऊ शकला असता. तुमची उदासीनता आमची थट्टा उडवत आहे, असे या ट्विटमध्ये म्हटले आहे.

भाजपने ट्विटमध्ये जॅकेटचा फोटो आणि त्याची किंमतही पोस्ट केली आहे. हे जॅकेट ब्रिटिश लक्जरी फॅशन ब्रँड 'बरबरी' कंपनीचे आहे. ब्लूमिंगडेल्सच्या वेबसाइटच्या मते, या जॅकेटची किंमत ही 68,145 रूपये आहे. राहुल गांधी यांनी यापूर्वी सुटा-बुटाचे सरकार असा आरोप केला होता. भाजपाने या ट्विटच्या माध्यमातून राहुल गांधींना उत्तर दिल्याचे सांगण्यात येते.

2015मध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्याबरोबरील भेटीवेळी पंतप्रधान मोदी यांनी सूट परिधान केला होता. त्यानंतर राहुल गांधींनी त्यांच्यावर मोठी टीका केली होती. 

दरम्यान, शिलाँग येथे आयोजित कार्यक्रमाचा राहुल गांधींनी चार हजार लोकांसह आनंद घेतला. गेल्या 15 वर्षांपासून काँग्रेसची इथे सत्ता आहे. मेघालयमध्ये 27 फेब्रुवारीला मतदान आहे.

Web Title: BJP takes jibe at Rahul Gandhi's Rs 70,000 jacket