Arvind Kejriwal : 'सिसोदिया-सतेंद्र जैन झांकी है, केजरीवाल अभी बाकी है; दिल्लीत भाजपची घोषणा | bjp targets aap manish sisodia satyendra jain arvind kejriwal by releasing posters | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

BJP Poster

Arvind Kejriwal : 'सिसोदिया-सतेंद्र जैन झांकी है, केजरीवाल अभी बाकी है; दिल्लीत भाजपची घोषणा

नवी दिल्ली - मनीष सिसोदिया यांच्या अटकेनंतर दिल्लीत आम आदमी पक्ष आणि भाजप यांच्यातील संघर्ष कायम आहे. मनीष सिसोदिया यांच्या बहाण्याने भाजप दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावरही निशाणा साधत आहे.

आता भाजपने एक पोस्टर जारी केले आहे, ज्याद्वारे पक्षाने अरविंद केजरीवाल यांच्यावर निशाणा साधला आहे. भाजपने जारी केलेल्या पोस्टरमध्ये मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन तुरुंगात दिसत आहेत. या पोस्टरवर मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन यांचा फोटो आहे. सत्येंद्र जैन हवाला प्रकरणात तुरुंगात गेले आहेत, त्यामुळे त्यांच्या हातात पैसे आहेत. कथित दारू घोटाळ्यात मनीष सिसोदिया तुरुंगात गेले असताना त्यांच्या हातात दारूची बाटली आहे.

या पोस्टरवर लिहिले की, 'आप'कडून सादर जोडी नंबर वन अरविंद केजरीवाल निर्मित चित्रपट तिहार थिएटरमध्ये सादर झाला आहे. जैन यांच्या डोक्यावर एक टोपी दिसत आहे. ज्यावर लिहिलं की, अभिनेता १, हवाला स्कॅमस्टर अशी टोपी आहे, तर सिसोदिया यांच्या कॅपवर 'अॅक्टर २', स्कॅमस्टर असे लिहिले आहे. भाजपने पोस्टर जारी करत कॅप्शनमध्ये लिहिले की, "'सिसोदिया-सतेंद्र जैन झांकी है, केजरीवाल अभी बाकी है.

दिल्लीत भाजपने आम आदमी पक्षाविरोधात निदर्शने केली. भाजप नेते आणि खासदार मनोज तिवारी म्हणाले की, "मनीष सिसोदिया यांच्यासोबत जे घडलं तेच अरविंद केजरीवाल यांच्याबाबतीतही होईल. सीबीआयपाठोपाठ ईडीनेही पुराव्यांच्या आधारे मनीष सिसोदिया यांना अटक केली. दिल्लीची जनता आता त्यांच्यावर विश्वास ठेवणार नाही, असंही तिवारी यांनी म्हटलं.