भाजप म्हणजे "ब्रेक जनता प्रॉमिस' - टीडीपी

वृत्तसंस्था
शुक्रवार, 16 मार्च 2018

भाजपकडून घाणेरडे राजकारण करण्यात येत आहे. तमिळनाडुमध्ये त्यांनी छोट्या पक्षांना उत्तेजन देत मोठ्या पक्षांमध्ये फूट पाडली. तसेच राजकारण आता भाजपकडून आंध्र प्रदेशमध्येही करण्यात येत आहे

नवी दिल्ली - भाजप म्हणजे "ब्रेक जनता प्रॉमिस' असल्याची टीका तेलगु देसम पक्षाच्या (टीडीपी) नेत्यांनी केली आहे. सरकारविरोधात लोकसभेमध्ये सोमवारी अविश्‍वासदर्शक ठराव मांडणार असल्याचा इशाराही टीडीपीकडून यावेळी देण्यात आला.

"भाजपकडून घाणेरडे राजकारण करण्यात येत आहे. तमिळनाडुमध्ये त्यांनी छोट्या पक्षांना उत्तेजन देत मोठ्या पक्षांमध्ये फूट पाडली. तसेच राजकारण आता भाजपकडून आंध्र प्रदेशमध्येही करण्यात येत आहे,'' अशी टीका टीडीपीचे खासदार जयदेव गल्ला यांनी केली. "भाजपने याआधी तेलगु जनतेची फसवणूक केली आहे. यावेळीही त्यांना असे करण्यात यश आले आहे,' असा आरोप आंध्र प्रदेशमधील मंत्री असलेल्या के एस जवाहर यांनी केला आहे.

टीडीपीकडून घेण्यात आलेली आक्रमक भूमिका आणि नुकताच गोरखपूर व फुलपूर यांसारख्या भाजपचा वरचश्‍मा असल्याचे मानल्या जात असलेल्या उत्तर प्रदेशमधील मतदारसंघांमधील मानहानीकारक पराभव; या पार्श्‍वभूमीवर आता केंद्र सरकारपुढील आव्हान अधिक आव्हानात्मक झाल्याचे मानण्यात येत आहे.

Web Title: BJP TDP No Confidence Motion India Andhra Pradesh