प्राणघातक हल्ल्यात भाजप पदाधिकाऱ्याचा जागीच मृत्यू

BJP Tiruchi unit member murdered
BJP Tiruchi unit member murdered

तिरुचिरापल्ली : भाजपच्या पदाधिकाऱ्याची अज्ञात हल्लेखोरांनी धारदार शस्त्राने हत्या केल्याचे आज उघडकीस आले. विजय रघू (वय 40) असे त्या पदाधिकाऱ्याचे नाव असून, ते भाजपचे मंडळ सचिव म्हणून कार्यरत होते.

आज (ता.२७) सकाळी बाजारात काम करत असतानाच त्यांना गुंडांच्या टोळीने घेरले आणि त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. त्यांचा जागीच मृत्यू झाला. यानंतर हल्लेखोर फरार झाले. हल्लेखोरांच्या तपासासाठी सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली जात आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. तिरुचिरापल्लीमधील गांधी मार्केटमध्ये हा खून झाला आहे.

विमान दुर्घटना : ८३ प्रवाशांसह विमान कोसळलं

गांधी मार्केट पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुढील तपास सुरु आहे. सीसीटीव्ही फुटेजद्वारे आरोपीची ओळख पटेल असा दावा पोलिसांकडून केला जात आहे. विजय रघू यांच्या हत्येनंतर काही भाजप कार्यकर्त्यांनी महात्मा गांधी रुग्णालयासमोर धरणे धरले. तसेच आरोपीला लवकरात लवकर अटक करण्याची मागणी केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com