भाजपकडून सरकारी यंत्रणांचा वापर - गुलाम नबी आझाद

वृत्तसंस्था
शनिवार, 19 मे 2018

बंगळूर : दोनच दिवसांपूर्वी कर्नाटकमध्ये मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतलेले  भाजपचे मुख्यंमंत्री येडियुरप्पा यांना बहुमत सिद्ध करता न आल्याने त्यांनी मुख्यमंत्री पदाचा राजिनामा दिला. त्यानंतर काँग्रेसच्या नेत्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

केंद्र सरकारने सरकारी यंत्रणांचा भाजपकडून वापर करण्यात आला. भाजपने सरकारी यंत्रणांचा याठिकाणी दुरुपयोग केला. भाजपने आमच्या आमदारांना फोडण्याचा प्रयत्न केला. भाजपने आपल्या आमदारांना डांबून ठेवले. पण, आम्ही आमच्या आमदारांना सभागृहात आणले. 117 आमदारांचे समर्थन आमच्याकडे होते. आता आम्ही सत्ता स्थापनेसाठी जात आहोत, असे काँग्रेसचे नेते गुलान नबी आझाद यांनी सांगितले.  

तर, भाजपकडे फक्त 104 आमदारांचे समर्थन होते. कर्नाटकच्या राज्यपालांनीही भाजपला 15 दिवसांचा वेळ दिला होता. आम्ही या विरोधात सर्वोच्च न्यायालयात गेलो. आम्ही सर्वोच्च न्यायालयाचे आभार मानतो. आमच्या कोणत्याही आमदाराने आमची साथ सोडली नाही. हा विजय लोकशाही आणि कायद्याचा आहे. आता राज्यपालांनी जेडीएसच्या कुमारस्वामींना मुख्यमंत्रीपदासाठी आमंत्रित केले आहे. आम्ही सत्ता स्थापनेचा दावा करण्यासाठी राज्यपालांकडे जात आहोत, असेही आझाद यांनी सांगितले. 

Web Title: bjp uses government system for elections said by gulam nabi azad