esakal | बिहारमध्ये भाजपचा व्हर्चुअल प्रचार 
sakal

बोलून बातमी शोधा

bjp

प्रचारासाठी भाजपने हायटेक प्रचार रथ तयार केला आहे. `भाजप है तैयार, आत्मनिर्भर बिहार` अशी घोषणा त्यावर लिहिली आहे. स्टार प्रचारकांच्या भाषणासाठी हा रथ सगळीकडे फिरविण्यात येणार आहे.

बिहारमध्ये भाजपचा व्हर्चुअल प्रचार 

sakal_logo
By
वृत्तसंस्था

पाटणा - बिहारमध्ये भाजपने व्हर्चुअल प्रचारावर भर दिला आहे. प्रत्येक वॉर्डसाठी व्हॉटसअॅप अॅडमिनची नेमणूक करण्यात आली आहे. 

बिहारमधील विधानसभेच्या २४३ जागांसाठीची निवडणूक येत्या काही दिवसांत जाहीर होण्याची शक्यता आहे. कोरोनाच्या संसर्गामुळे घरोघरी जाऊन प्रचार करण्यावर मर्यादा आल्या आहेत. त्यामुळे प्रचारासाठी तंत्त्रज्ञानाचा जास्तीत जास्त उपयोग करण्याचे सर्वच पक्षांनी ठरविले आहे. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

प्रत्येक निवडणुकीसाठी भाजप बूथ पातळीवर एक - एक प्रमुख नेमून प्रचाराची धुरा सोपवली जात असे. यावेळी मात्र व्हर्चुअल प्रचारावर भर देत प्रत्येक वॉर्डसाठी एक व्हॉटसअॅप प्रमुख नेमण्यात आला आहे. पक्षाचे ऑडिओ-व्हिडिओ संदेश, त्याबरोबर प्रचारासंबंधीची इतर माहिती सर्वांपर्यंत पोहचविण्याचे काम त्यांच्यावर दिले आहे. याशिवाय इतर समाज माध्यमांच्याद्वारे लोकांशी संवाद साधण्यात येत आहे. फेसबुक, ट्विटर व यूट्यूबवर भाजपचे सर्वाधिक `फॉलोअर` आहेत. त्याचा फायदा घेण्याचा प्रयत्न पक्ष करत आहे. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

हायटेक रथ 
प्रचारासाठी भाजपने हायटेक प्रचार रथ तयार केला आहे. `भाजप है तैयार, आत्मनिर्भर बिहार` अशी घोषणा त्यावर लिहिली आहे. स्टार प्रचारकांच्या भाषणासाठी हा रथ सगळीकडे फिरविण्यात येणार आहे. त्यावर उभे राहून भाषण देण्याची सोय करण्यात आली आहे. मजूरांच् प्रश्नाचा फटका बसू नये म्हणून भाजपने गावांगावांवर लक्ष केंद्रीय केले आहे. आतापर्यंत ६२ हजार बूथपर्यंत कार्यकर्ते पोहचल्याचा दावा भाजपकडून करण्यात येत आहे. बिहारमधील भाजपच्या प्रत्येक खासदाराला दररोज दोन पंचायतींपर्यंत पोहोचण्यास सांगण्यात आले आहे. सप्टेंबरअखेपर्यंत प्रत्येक खासदाराने ६० पंचायतींशी संपर्क केलेला असणे अपेक्षित धरले आहे. 

`फिर से नितीश कुमार` 
भाजपचा सहकारी असलेल्या संयुक्त जनता दलानेही अत्याधुनिक प्रचार रथ तयार केला आहे. बिहार की पुकार, फिरसे नितीश कुमार अशी घोषणा त्यावर लिहिण्यात आली आहे. त्यावर एलईडी स्क्रीनही लावण्यात आला आहे. साऊंड सिस्टीम, जनरेटर असा लवाजमाही त्यासोबत आहे. त्याचबरोबर जेडीयूने कार्यकर्त्यांना सीडी आणि पेन ड्राइव्ह दिले आहेत. त्यात नेत्यांची भाषणे आणि हिंदी व भोजपुरीतील प्रचार गीते आहेत. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप