भाजप देशभरात घेणार 70 पत्रकार परिषदा

वृत्तसंस्था
रविवार, 16 डिसेंबर 2018

नवी दिल्ली : राफेल विमान खरेदीप्रकरणी काँग्रेसकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सत्ताधारी भाजपवर वारंवार टीका केली जात आहे. काँग्रेसकडून करण्यात येत असलेल्या टीकेला भाजपकडून आता उत्तर देण्यात येणार आहे. यासाठी भाजपकडून राफेल करारप्रकरणाची बाजू मांडण्यासाठी देशभरात तब्बल 70 पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात येणार आहे.

सर्वोच्च न्यायालयात राफेल विमान खरेदीप्रकरणाची सुनावणी दोन दिवसांपूर्वी झाली. यामध्ये न्यायालयाने हस्तक्षेप करण्यास नकार दिला. न्यायालयाच्या या निर्णयावर काँग्रेसकडून अद्यापही पंतप्रधान मोदी आणि भाजपवर निशाणा साधला जात आहे. त्यामुळे या प्रकरणाची सविस्तर माहिती देण्यासाठी आणि काँग्रेसकडून करण्यात आलेल्या आरोपांना प्रत्युत्तर देण्यासाठी भाजपकडून 70 पत्रकार परिषदा घेण्यात येणार आहेत.

दरम्यान, यासाठी भाजपशासित राज्यातील मुख्यमंत्री या पत्रकार परिषदा घेऊन पक्षाची भूमिका आणि बाजू मांडणार आहेत. याशिवाय संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन, केंद्रीयमंत्री रविशंकर प्रसाद, प्रकाश जावडेकर यांच्यासारखे ज्येष्ठ नेतेही पत्रकार परिषद घेणार आहेत.

Web Title: BJP will be held 70 Press Conference across the country