...म्हणून भाजप घेणार आता 250 पत्रकार परिषदा!

वृत्तसंस्था
Saturday, 21 December 2019

जे. पी. नड्डा यांनी घेतली बैठक

- 3 कोटी कुटुंबांना दिल्या जाणार भेटी

नवी दिल्ली : देशात नागरिकत्त्व सुधारणा कायद्याला (सीएए) विविध राज्यांतून विरोध केला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारकडून हा कायदा लागू केला गेल्याने भाजपकडून याचे मोठे समर्थन केले जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर आता भाजपकडून देशभरातील सुमारे 3 कोटी कुटुंबांना भेटी दिल्या जाणार आहेत. तसेच 250 पत्रकार परिषदाही घेतल्या जाणार आहेत. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

भाजपचे राज्यसभा खासदार भूपेंद्र यादव यांनी याबाबतची घोषणा केली आहे. ते म्हणाले, येत्या 10 दिवसांत आम्ही एक विशेष मोहीम राबविणार आहोत. त्यानुसार आम्ही 3 कोटी कुटुंबांशी भेटी घेणार आहोत. नागरिकत्त्व सुधारणा कायदा काय आहे, याबाबतची माहिती दिली जाणार आहे. भेटीगाठी या कायद्याला पाठिंबा दर्शविण्यासाठी असणार आहेत. त्यासाठी 250 पत्रकार परिषदाही घेतल्या जाणार आहेत. हा कायदा लागू करण्यापूर्वी सरकारकडून याबाबत योग्य माहिती दिली गेली नाही, म्हणून देशभरातून याला विरोध केला जात आहे, असे भाजपच्या अनेक नेत्यांचे म्हणणे होते. त्यामुळे आता भाजपकडून देशभरात याबाबतची माहिती दिली जाणार असून, यामाध्यमातून सर्वसामान्यांमध्ये जे काही गैरसमज आहेत. ते दूर करण्याचे प्रयत्न केले जाणार आहेत. 

Image result for CAA

जेडीयू आणि एलजेपी म्हणते...

संयुक्त जनता दल (जेडीयू) आणि लोक जनशक्ती पक्षाने (एलजेपी) यापूर्वी सांगितले होते, की सरकारला या कायद्याबाबत नागरिकांमध्ये असलेले गैरसमज दूर करायला हवेत. तसेच राज्यसभा खासदार स्वप्न दासगुप्ता यांनी कोलकाता येथे एक पत्रकार परिषद घेण्याची मागणीही केली होती. 

आमची 40 दिवसांची मोहिम यशस्वी झाली : संजय राऊत

Image result for BJP

जे. पी. नड्डा यांनी घेतली भेट

भाजपचे कार्यकारी अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी दिल्लीतील भाजप कार्यालयात या मुद्द्यावरून पक्षातील नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या होत्या. त्यानंतर आता देशभरात ही मोहीम राबवली जाणार आहे.

नितीश कुमारही मोदी सरकारच्या निर्णयाविरोधात; 'या' कायद्यास नकार


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP will Organised 250 Press Conference and meet with 3 Crores Family