'हिमाचल'मध्ये भावी मुख्यमंत्रीच पराभूत; आता भाजपला नेता कोण?

Prem Kumar Dhumal
Prem Kumar Dhumal

शिमला - हिमाचल प्रदेशात भाजपने मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार म्हणून घोषणा केलेल्या प्रेमकुमार धुमल यांनाच पराभवाला सामोरे जावे लागले आहे. मात्र, भाजपने काँग्रेसचा पराभव करत सत्ता मिळविण्यात यश मिळविले आहे.

हिमाचलमध्ये 68 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत भाजपने 40 जागा जिंकून सत्ता मिळविली आहे. भाजपने निवडणुकीपूर्वीच प्रेमकुमार धुमल यांना मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार घोषित केले होते. काँग्रेसचे मुख्यमंत्री वीरभद्रसिंह यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप असतानाही काँग्रेसने त्यांनाच पुढे करत निवडणूक लढविली. धुमाल यांना काँग्रेसचे उमेदवार राजेंद्रसिंह राणा यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला.

या पराभवानंतर बोलताना धुमल म्हणाले, की भाजपने राज्यात मिळविलेल्या विजयापुढे माझा पराभव खूपच छोटा आहे. भाजपला निवडून दिल्याबद्दल मी नागरिकांचे आभार मानतो. मला वाटत नव्हते माझा पराभव होईल. राजकारणात कधी विजय होतो, तर कधी पराभव स्वीकारावा लागतो.

धुमल यांना पिछाडी भरून काढण्यात अपयश आल्यास सत्ता मिळूनही 'मुख्यमंत्री कोण' या प्रश्‍नाला भाजपला सामोरे जावे लागू शकते. अशा वेळी ज्येष्ठ केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा किंवा तरुण खासदार अनुराग ठाकूर यांचा पर्याय भाजप नेतृत्त्वासमोर असू शकतो. मात्र, नड्डा आणि ठाकूर दोघेही खासदार असल्याने सत्ता येऊनही भाजपला हिमाचल प्रदेशमध्येही उत्तर प्रदेश आणि गोव्याचा कित्ता गिरवावा लागू शकतो. गोव्यामध्ये मनोहर पर्रीकर यांना केंद्रातून राज्यात पाठविण्यात आले होते; तर उत्तर प्रदेशमध्ये सत्ता आल्यानंतर मुख्यमंत्रीपदी खासदार योगी आदित्यनाथ यांना नियुक्त करण्यात आले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com