बेळगाव : स्थानिक स्वराज्य संस्थेत "कमळा'ची सरशी 

bjp
bjp

बेळगाव : स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत सर्वाधिक 104 जागा जिंकून भाजपने "कमळ' फुलविले आहे. 85 जागांवर कॉंग्रेस उमेदवारांनी विजय मिळविला आहे. जेडीएस पक्षाच्या 10 उमेदवारांनी बाजी मारली आहे. दरम्यान, 144 अपक्ष उमेदवार विजयी झालेले आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर लागलेला निकाल भाजपच्या गोटात उत्साह वाढविणारा ठरला आहे. काँग्रेसने पत राखली आहे. पण, पक्ष संघटनेच्या पातळीवर काम करण्याची गरज असल्याचे संकेत दिले आहेत. जेडीएसचा मात्र चंचूप्रवेश स्थानिक संस्थेच्या निवडणूकनिमित्त झाला आहे. 

जिल्ह्यातील 14 स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्वच जागांचा निकाल सोमवारी (ता. 3) दुपारपर्यंत सर्वत्र जाहीर झाला. त्यामध्ये 343 जागांपैकी 144 जागांवर अपक्ष उमेदवारांनी बाजी मारली. राष्ट्रीय व प्रादेशिक पक्षांनी निवडणुकीमध्ये भाग घेतला होता. यानुसार भाजपचे सर्वाधिक 104 उमेदवार विजयी झाले आहेत. यामुळे जिल्ह्यामध्ये मोठा पक्ष म्हणून उदयास आला आहे. कॉंग्रेस पक्षाला दुसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले. 85 जागा कॉंग्रेसला मिळाल्या आहेत. प्रादेशिक पक्ष धजदची कामगिरी फारशी उल्लेखनीय नाही. दोन स्थानिक स्वराज्य संस्थांत 10 जागांवर पक्षाला यश मिळाले आहे. 

स्थानिक स्वराज्य संस्थानिहाय निकाल 
स्थानिक संस्था एकूण जागा
भाजप-काँग्रेस-धजद-अपक्ष 
गोकाक : 31-1-0-0-30 
निपाणी : 31-13-0-0-18 
रामदूर्ग : 27-1610-0-1 
बैलहोंगल : 27-6-18-0-3 
संकेश्‍वर : 23-11-11-0-1 
सौदत्ती : 27-17-9-0-1 
मुडलगी : 23-11-0-8-4 
चिक्कोडी : 23-0-0-0-23 
कुडची : 23-8-14-01 
हुक्केरी : 23-8-12-0-3 
सदलगा : 23-13-0-2-8 
कन्नूर : 23-0-0-0-23 
रायबाग : 19-0-11-0-8 
खानापूर : 20-0-0-0-20 
--------------------------------- 
एकूण : 343-104-85-10-144 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com