पं.बंगालमध्ये भाजप कार्यकर्त्याची हत्या

वृत्तसंस्था
शनिवार, 2 जून 2018

पश्चिम बंगालमध्ये पुरुलिया जिल्ह्यातील डाभा गावात विद्यूत वाहिनीच्या खांबाला लटकवलेला आणखी एक मृतदेह आढळला. हा मृतदेह 32 वर्षीय भाजप कार्यकर्ता दुलाल कुमार याचा आहे. तीन दिवसांपुर्वी बलरामपूर जिल्ह्यातील सुपर्डी गावातील त्रिलोचन महातो (वय 18) या दलित तरुणाची मृतदेहसुद्धा झाडाला लटकवलेल्या अवस्थेत आढळला होता. त्रिलोचन हा भाजपच्या दलित युथ विंगचा कार्यकर्ता होता. हे दोन्ही खून तृणमूल कॉंग्रेसच्या (टीएमसी) कार्यकर्त्यांनी केल्याचा आरोप भाजप कडून करण्यात येत आहे.

कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये पुरुलिया जिल्ह्यातील डाभा गावात विद्यूत वाहिनीच्या खांबाला लटकवलेला आणखी एक मृतदेह आढळला. हा मृतदेह 32 वर्षीय भाजप कार्यकर्ता दुलाल कुमार याचा आहे. तीन दिवसांपुर्वी बलरामपूर जिल्ह्यातील सुपर्डी गावातील त्रिलोचन महातो (वय 18) या दलित तरुणाची मृतदेहसुद्धा झाडाला लटकवलेल्या अवस्थेत आढळला होता. त्रिलोचन हा भाजपच्या दलित युथ विंगचा कार्यकर्ता होता. हे दोन्ही खून तृणमूल कॉंग्रेसच्या (टीएमसी) कार्यकर्त्यांनी केल्याचा आरोप भाजप कडून करण्यात येत आहे.

दुलाल याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे. वैद्यकीय अहवाल आल्याशिवाय मृत्यूचे कारण समजमार नाही. या दोन्ही प्रकरणाची सीआयडी मार्फत चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती, कायदा व सुवस्था पोलिस अधिकारी (एडीजी) अंजू शर्मा यांनी दिली.  

या दोन संशयीत मृत्यूंमुळे पंश्चिम बंगालमध्ये टीएमसी आणि भाजप यांच्यामध्ये चांगलेच राजकारण पेटले आहे. भाजपचे राष्ट्रीय सचिव राहूल सिन्हा यांनी टीएमसीवर निशाना साधत या दोन्ही प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली आहे. 
सिन्हा म्हणाले, "पश्चिम बंगामध्ये टीएमसीचा आधार घसरत चालला आहे. त्यामुळे माओवाद्यांशी हात मिळवणी करून भाजप कार्यकर्त्यांच्या हत्या केल्या जात आहे. बलरामपूर जिल्ह्यातील त्रिलोचन महातो याच्या हत्येनंतर दुलाल कुमार या कार्यकर्त्याची त्याच पद्धतीने हत्या करण्यात आली. या प्रकरणांची सीबीआय चौकशी व्हावी अशी मागणी आम्ही करत आहोत.

"आम्ही या दोन्ही घटनांचा निषेध करतो. या प्रकरणांची सर्व बाजून चौकशी करून आरोपींना कायद्यानुसार कठोर शिक्षा करण्यात यावी. झारखंड राज्याचा सिमेवर घडलेल्या या घटनांमध्ये बजरंग दल, माओवादी किंवा भाजपचा हात असू शकतो. याच्या सखोल चौकशीनंतर सत्य बाहेर येईल." असे ट्विट टीएमसीचे खासदार देरेक ओब्रायन यांनी केले आहे.

 

Web Title: bjp worker killed in Bengal