बंगळूरमध्ये घुमल्या 'मोदीऽऽ मोदीऽऽ'च्या घोषणा 

मंगळवार, 15 मे 2018

बंगळूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी हा हुकमी एक्का आणि अध्यक्ष अमित शहा यांच्या प्रचारयंत्रणेच्या जोरावर भाजपने कर्नाटकची मोहीम जिंकत दक्षिणेत पाय रोवण्यास सुरवात केली आहे. विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीमध्ये कल स्पष्ट होताच भाजपच्या कार्यकर्त्यांनी पक्ष कार्यालयासमोर जोरदार जल्लोष केला. 

कर्नाटकच्या निवडणुकीत भाजप सर्वांत मोठा पक्ष ठरला आहे. मतमोजणीचे कल पाहता भाजपला येथे स्वबळावर सत्ता स्थापन करण्यासाठी काही मोजक्‍या जागांची गरज भासू शकते. 

मतमोजणीच्या पहिल्या टप्प्यात सकाळी आठ ते नऊ या एका तासामध्ये कॉंग्रेसला आघाडी मिळाली होती. त्यानंतर मात्र भाजपने जोरदार मुसंडी मारली. त्यामुळे कॉंग्रेसला आणखी एक राज्य गमवावे लागले आहे. भाजपच्या पक्ष कार्यालयाबाहेर समर्थकांचा जल्लोष सुरु असताना कॉंग्रेसच्या पक्ष कार्यालयामध्ये मात्र शुकशुकाट होता. 

Image may contain: 3 people, people smiling, outdoor

Image may contain: 6 people, crowd and outdoor

Image may contain: 19 people, people smiling, people standing and crowd

Web Title: BJP workers celebration in Karnataka