Election Results : भाजपच्या 'या' उमेदवाराचा केवळ 181 मतांनी विजय

वृत्तसंस्था
शुक्रवार, 24 मे 2019

लोकसभा निवडणुकीच्या निकालातून देशात मोदींची त्सुनामी आली होती हे स्पष्ट झाले आहे. भाजपने पूर्ण बहुमताचा आकडा पार केला. काही ठिकाणी 'काटे की टक्कर' पहायला मिळाली. मात्र, उत्तर प्रदेशातील मछलीशहर येथील जागेवर निकालादरम्यान एवढी चुरस रंगली की उमेदवार आणि त्यांच्या कायर्कर्त्यांनी श्वास रोखून धरला आणि रात्री दहा वाजता निकाल जाहीर झाला. येथे भाजपचे बी पी सरोज यांनी बीएसपीचे टी. राम यांचा केवळ 181 मतांनी पराभव केला.

नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीच्या निकालातून देशात मोदींची त्सुनामी आली होती हे स्पष्ट झाले आहे. भाजपने पूर्ण बहुमताचा आकडा पार केला. काही ठिकाणी 'काटे की टक्कर' पहायला मिळाली. मात्र, उत्तर प्रदेशातील मछलीशहर येथील जागेवर निकालादरम्यान एवढी चुरस रंगली की उमेदवार आणि त्यांच्या कायर्कर्त्यांनी श्वास रोखून धरला आणि रात्री दहा वाजता निकाल जाहीर झाला. येथे भाजपचे बी पी सरोज यांनी बीएसपीचे टी. राम यांचा केवळ 181 मतांनी पराभव केला.

अंतिम निकाल लागेपर्यंत बीपी सरोज यांना 488397 मते मिळाली. तर टी. राम यांनी 488216 मते मिळाली. या लोकसभा निवडणुकीत सर्वांत कमी मतांनी मिळवलेला हा विजय आहे. मतमोजणी दरम्यान येथे चढ- उतार दिसून आला. पहिल्या फेरीत भाजप उमेदवाराने केवळ 1400 मतांची आघाडी घेतली. तिसऱ्या फेरीत बीएसपीचे उमेदवार 01 हजार मतांनी आघाडीवर राहिले. हा चढ-उतार पुढील फेरीतही कायम राहिला.

टी. राम यांनी केराकत आणि मछलीशहर विधानसभा क्षेत्रात सुमारे 26000 मतांची आघाडी घेतली. जफराबाद येथे टी. राम पुढे होते. मात्र, बीपी सरोज यांना पिंडरा आणि जौनपूर येथील मडियाहू विधानसभा क्षेत्रातील मतमोजणी दरम्यान दिलासा मिळाला. येथून सुमारे 49 हजार मतांची आघाडी घेतल्याने त्यांनी विजय प्राप्त केला. निकालानंतर पोस्टल बॅलेट वैधतेवरून वाद निर्माण झाला होता. यावेळी आरोप-प्रत्यारोप झाले आणि अखेर रात्री उशिरा भाजपचे बीपी सरोज यांना विजयी घोषित करण्यात आले


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJPs B P Saroj records lowest victory margin wins Machhlishahr seat by 181 votes