अमित शहांच्या कार्यक्रमात महिलांची अंतर्वस्त्रे तपासल्याचा आरोप

At BJPs Mahila Sammelan chaired by Amit Shah women strip searched
At BJPs Mahila Sammelan chaired by Amit Shah women strip searched

नवी दिल्ली- भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांची जनसभा वादात अडकण्याची शक्यता आहे. अमित शहा यांच्या एका सभेदरम्यान सुरक्षेच्या नावाखाली महिला आणि तरुणींचे अंतर्वस्त्रे तपासण्यात आली असल्याचा असा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या सभेत शहा यांना काळे झेंडे दाखवण्यात येऊ नयेत म्हणून कार्यक्रमात काळे कपडे परिधान करुन सहभागी झालेल्या महिला व तरुणींची अंतर्वस्त्रेही तपासण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.

सुरक्षेच्या नावाखाली हे सर्व करण्यात आले असल्याचे सांगितले जात आहे. छत्तीसगडच्या चरौदा येथे आयोजित महिला महासंमेलनात सहभागी होण्यासाठी अमित शाह छत्तीसगडच्या दौऱ्यावर आहेत. या सभेत अशी घटना झाली असल्याचा आरोप करण्यात आला आहे. तपासणीसाठी आतापर्यंत तरुणांचे मोजे आणि पट्टे उतरवले जात होते. परंतु या घटनेने महिलांच्या सुरक्षिततेवर मोठे प्रश्नचिन्ह उभे केले जात आहे.

भाजपाचे नेते आणि मंत्री बलात्काऱ्यांना संरक्षण देतात, त्यांच्याकडून काही अपेक्षा ठेवून उपयोग नाही. बेटी बढाव, बेटी पढावच्या जागी भाजपावाल्यांपासून मुलींना वाचवा, असे नारे आता सुरू झाले आहेत, अशी टीका छत्तीसगड काँग्रेसच्या नेत्या किरणमयी नायक यांनी केली आहे. तसेच, मध्यप्रदेश महिला काँग्रेसकडूनही याचा ट्विटरवर निषेध करण्यात आला आहे.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com