भाजपचे खासदारच म्हणतात, आरबीआय गव्हर्नर भ्रष्ट

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 23 डिसेंबर 2018

हैदराबाद : रिझर्व्ह बॅंकेच्या गव्हर्नरपदी नुकतीच नियुक्ती झालेले शक्तीकांत दास हे भ्रष्टाचारात अडकले असून, त्यांची या पदावर झालेली निवड आश्‍चर्यकारक आहे, असा आरोप भाजप नेते सुब्रह्मण्यम स्वामी यांनी आज केला. 

"नवे गव्हर्नर भ्रष्ट आहेत. मीच त्यांना अर्थमंत्रालयातून बाहेर काढले. भ्रष्टाचाराबद्दल मंत्रालयातून बाहेर काढलेल्या व्यक्तीलाच गर्व्हनर करणे आश्‍चर्यकारक आहे,' असे स्वामी म्हणाले. आरोप करताना स्वामी यांनी भ्रष्टाचाराचा तपशील दिला नाही. 

गव्हर्नरपदासाठी कोण योग्य आहे, असे स्वामी यांना पत्रकारांनी विचारले असता त्यांनी आयआयएम बंगळूरमधील प्राध्यापक आर. विद्यानाथन यांचे नाव सांगितले.

Web Title: The BJP's MP says the RBI governor is corrupt