त्यामुळेच अमित शहांना आला 'डुकराचा ताप' - काँग्रेस नेते

वृत्तसंस्था
गुरुवार, 17 जानेवारी 2019

बंगळूर - कर्नाटकमधील कॉंग्रेसचे नेते बी. के. हरिप्रसाद यांनी आज भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्या आजारपणाबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे. आमचे आमदार परत आल्याने अमित शहा घाबरून आजारी पडले आहेत, त्यांना ताप आला असून, तो तापदेखील काही साधा नाही. त्यांना स्वाइन फ्लू (डुकराचा ताप) झाला आहे. कर्नाटकमधील कॉंग्रेसचे सरकार पाडण्याचा प्रयत्न केल्यास त्यांना केवळ स्वाइन फ्लूच नाही तर उल्टी आणि लूज मोशनदेखील होईल, असे हरिप्रसाद यांनी म्हटले आहे. 

हरिप्रसाद यांच्या वक्तव्यावर टीका करताना केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी म्हटले आहे की, 'त्यांच्या या वक्तव्यावरून कॉंग्रेसची विचारसरणी किती नीच आहे, हेच दिसून येते. अमित शहा तापामुळे उपचार घेत असले तरीसुद्धा कॉंग्रेस नेत्यांच्या मानसिक आजारांवर मात्र कसलाच उपचार नाही.'' केंद्रीय मंत्री राजवर्धनसिंह राठोड यांनीही अशा प्रकारच्या वक्तव्यांमधून कॉंग्रेस नेते किती हताश झाले आहे हेच दिसून येते, असेही म्हटले आहे. 

प्रकृतीत सुधारणा 
सध्या "एम्स'मध्ये उपचार घेत असलेल्या अमित शहा यांच्या प्रकृतीत सुधारणा होऊ लागली असून, दोन ते तीन दिवसांमध्ये त्यांना रुग्णालयातून सोडण्यात येईल, असे भाजपकडून आज सांगण्यात आले. केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्यासह अन्य भाजप नेत्यांनी आज रुग्णालयात जाऊन शहा यांची भेट घेत त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.

Web Title: bk hariprasad comment on Amit Shaha politics