उद्धव ठाकरे 'बारसू'च्या आंदोलकांना भेटणार; दौऱ्याची तारीख केली जाहीर : BKC MVA Rally | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

office bearers of BJP Yuva Morcha and their workers joined Shiv Sena Uddhav Thackeray party

BKC MVA Rally: उद्धव ठाकरे 'बारसू'च्या आंदोलकांना भेटणार; दौऱ्याची तारीख केली जाहीर

मुंबई : राज्यात सध्या बारसू इथल्या रिफायनरीवरुन मोठं वादंग पेटलं आहे. स्थानिकांचा याला विरोध होतोय पण सरकार प्रकल्पावर ठाम आहे. या प्रकरणावर आज शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांनी आपली भूमिका मांडली. बारसूतील आंदोलकांशी तिथं जाऊन आपण बोलणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे, या दौरा किती तारखेला असेल याची घोषणाही त्यांनी यावेळी केली. बीकेसीतील महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभेत ते बोलत होते. (BKC MVA Rally Uddhav Thackeray to meet people of Barsu tour date announced at 6 may 2023)

उद्धव ठाकरे म्हणाले, "राज्यात एक विषय भडकलेला आहे बारसू. बारसूबाबत मी फक्त या सभेतच बोलणार नाही तर येत्या ६ तारखेला मी बारसूमध्ये जाऊन तिथल्या लोकांना भेटून बोलणार आहे. कसं काय तुम्ही मला अडवू शकता. बारसू काय पाकव्याप्त काश्मीर किंवा बांगलादेश नाही. मी ६ तारखेला पहिल्यांदा बारसूला जणार त्यानंतर महाडच्या सभेला जाणार"

सरकारमधील लोक बारसूमध्ये माझ्या नावानं पत्र दाखवत आहेत, सांगताहेत उद्धव ठाकरेंनी ही जागा सुचवली होती. हो दाखवली होती, आमच्या सरकारनं सुचवली होती. पण त्या पत्रात असं कुठं लिहिलं आहे का की, पोलिसांना घुसवा, लाठ्या चालवा, अश्रुधुरांच्या नळकांड्या फोडणार? अशा शब्दांत त्यांनी जोरदार टीकाही केली.

टॅग्स :Uddhav ThackerayDesh news