सैफ, सोनाली आणि तब्बू यांना न्यायालयाचा दणका; खंडपीठाची नोटीस

सोमवार, 20 मे 2019

1998च्या काळवीट शिकार प्रकरणी राजस्थान उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने अभिनेता सैफ अली खान, अभिनेत्री सोनाली बेंद्रे, तब्बू आणि नीलम कोठारी यांना नोटीस दिली आहे. सोमवार (ता. 20) ही नोटीस जारी करण्यात आली आहे.

रायपूर: 1998च्या काळवीट शिकार प्रकरणी राजस्थान उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने अभिनेता सैफ अली खान, अभिनेत्री सोनाली बेंद्रे, तब्बू आणि नीलम कोठारी यांना नोटीस दिली आहे. सोमवार (ता. 20) ही नोटीस जारी करण्यात आली आहे.

5 एप्रिल 2018 रोजी राजस्थान सरकारने दाखल केलेल्या याचिकेनंतर ही नोटीस या संबंधितांना देण्यात आली आहे. या प्रकरणावर आता आठ आठवड्यानंतर सुनावणी होणार आहे. याआधीही उच्च न्यायालयाने मार्च 2019 मध्ये याप्रकरणी दोषींना नोटीस जारी केली होती.

या प्रकरणीसोबत असणाऱ्या दुष्यंत सिंह यांनाही उच्च न्यायालयाने नोटीस पाठविली आहे. न्यायालयाने यापूर्वी काळवीट शिकार प्रकरणी सलमान खानला पाच वर्षाची शिक्षा सुनावली आहे. ही 'घटना हम साथ साथ है' या चित्रपटावेळी घडली होती. सुनवाईच्या वेळी सरकारी वकिलाने सांगितल्याप्रमाणे ही घटना घडली त्यावेळी सलमान खान जिप्सी चालवत होता तर इतर कलाकार यावेळी सोबत होते.