नोटाबंदीला महिना; विरोधकांचा 'काळा दिवस'!

वृत्तसंस्था
गुरुवार, 8 डिसेंबर 2016

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा चलनातून रद्द करण्याचा निर्णयाला आज (गुरुवार) महिना पूर्ण झाल्यानंतरही परिस्थिती बदलली नसल्याचे म्हणत विरोधक आजचा दिवस काळा दिवस म्हणून पाळत आहेत. संसद परिसरातील महात्मा गांधींच्या पुतळ्याजवळ एकत्र येऊन विरोधक आज आज कोणत्याही घोषणा न देता मौन पाळणार आहेत.

विरोधी पक्षांचे नेते आज महात्मा गांधींच्या पुतळ्याजवळ एकत्र आले असून त्यांनी पाचशे आणि हजार रुपयांच्या जुन्या नोटांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्या प्रतिमा हातात धरल्या आहेत. वृत्तसंस्थेशी बोलताना कॉंगेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी म्हणाले, "कॅशलेस अर्थव्यवस्थेमागे काही लोकांना आर्थिक व्यवहारांमुळे जास्तीत जास्त लाभ देणे हाच उद्देश आहे. यामुळे देशाचे मोठे नुकसान होत आहे. संसदीय कामकाज सुरळितपणे चालू देणे ही सरकार आणि सभागृह अध्यक्षांची जबाबदारी आहे. विरोधकांची नाही. देशातील नागरिक त्रस्त असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी हसत आहेत. संसदेतील चर्चेपासून मोदी दूर पळत आहेत. आम्ही त्यांना पळून जाऊ देणार नाही. लोकसभेत मला जर बोलू दिले, तर मी सांगेल की पेटीएम कसे "पे टू मोदी' होत आहे. मोदी सुरुवातीला काळ्या पैशाबद्दल बोलत होते. नंतर दहशतवादाबद्दल. नंतर बनावट नोटांबद्दल आणि नंतर कॅशलेस अर्थव्यवस्थेवर बोलत आहेत.' अशा शब्दांत गांधी यांनी मोदींना लक्ष्य केले आहे.

तर "नोटाबंदीच्या निर्णयाला आज 30 दिवस झाले. आज आम्ही काही घोषणा देणार नाहीत. काळा दिवस पाळणार आहोत. मौन पाळणार आहेत', अशी माहिती कॉंग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांनी दिल्ली. मल्लिकार्जुन खर्गे यांनीही सरकारवर टीका करताना म्हणाले की, "आधी मोदींनी 5 दिवस मागितले, नंतर 5 आठवडे आणि आता 50 दिवस मागत आहेत. हे काही योग्य नाही. एक महिना उलटून गेल्यानंतरही परिस्थिती पन्नास टक्केही सुधारलेली नाही.'

Web Title: Black day by opposition