काळ्यादिनी बेळगावात प्रत्येक घरावर काळा झेंडा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 25 ऑक्टोबर 2018

बेळगाव - काळ्यादिनी प्रत्येक घरावर काळा झेंडा लाऊन सरकारचा जाहीर निषेध नोंदवावा. काळ्यादिनी निघणाऱ्या मूक सायकल फेरीत शहापूर विभागातून हजारोंच्या संख्येने सहभागी होण्याचा निर्धार करण्यात आला.

बेळगाव - काळ्यादिनी प्रत्येक घरावर काळा झेंडा लाऊन सरकारचा जाहीर निषेध नोंदवावा. काळ्यादिनी निघणाऱ्या मूक सायकल फेरीत शहापूर विभागातून हजारोंच्या संख्येने सहभागी होण्याचा निर्धार करण्यात आला.

काळा दिन व इतर विषयांवर चर्चा करण्यासाठी बुधवारी सायंकाळी कोरे गल्ली येथील गंगापुरी मठात शहापूर विभागातील समिती कार्यकर्त्यांची बैठक झाली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मध्यवर्ती व शहर महाराष्ट्र एकीकरण समिती अध्यक्ष दीपक दळवी होते. श्री. दळवी यांनी, काळ्यादिनाच्या फेरीत सहभागी होणे हे प्रत्येक मराठी भाषिकांचे कर्तव्य असून लाखोंच्या संख्येने सहभागी होऊन पुन्हा एकदा केंद्र आणि राज्य सरकारचे लक्ष वेधून घेऊया, असे मत व्यक्त केले.

पंच शिवाजी हावळाणाचे यांनी कोरे गल्ली व शहापूर भागातील प्रत्येक गल्लीत जण जागृती मोहीम राबवून अधिक संख्येने सहभागी होण्यासाठी प्रयत्न करा, असे मत व्यक्त केले.

माजी महापौर महेश नाईक, नगरसेवक राजू बिर्जे, शिवाजी कुडचकर, किरण धामणेकर, रामा भिंगुर्डे, राजकुमार बोकडे, बंडू पाटील, रणजीत हावळानाचे, संजय नेसरीकर, कल्लाप्पा हंडे, प्रसाद मरगाळे आदींनी मनोगत व्यक्त केले.

विभागवार समिती नेमून कार्यकर्त्याना एकजूट करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. बैठकीला समितीचे खजिनदार प्रकाश मरगाळे, प्रकाश पाटील, अभिजीत मजुकर, ओमकार नेसरीकर, तीर्थ शिंदोळकर, राजू चौगुले, मोहन पाटील, चंद्रकांत मजुकर, पांडुरंग शिंदे, मोहन पाटील, ईश्वर मजुकर, श्रीकांत कडोलकर, पुंडलिक जाधव, शंकर पाटील, शिवाजी मजुकर, जोतिबा पेडणेकर, गजानन शहापूरकर, नागेश कुंडेकर उपस्थित होते.

Web Title: Black flag at every home in Belgaum on black-day