विदेशातील शिख व्यक्तींची काळी यादी रद्द - राम माधव   

वृत्तसंस्था
मंगळवार, 22 मे 2018

खलिस्तान चळवळीशी कथित संबंध असल्याच्या कारणामुळे तयार करण्यात आलेली काळी यादी रद्द करण्यात आली असल्याची माहिती भाजपचे सरचिटणीस राम माधव यांनी येथील शिख समुदायाच्या नेत्यांशी बोलताना दिली. 
 

वॉशिंग्टन - खलिस्तान चळवळीशी कथित संबंध असल्याच्या कारणामुळे तयार करण्यात आलेली काळी यादी रद्द करण्यात आली असल्याची माहिती भाजपचे सरचिटणीस राम माधव यांनी येथील शिख समुदायाच्या नेत्यांशी बोलताना दिली. 

खलिस्तानच्या चळवळीशी कथित संबंध असलेल्या विदेशात राहणाऱ्या काही शिख व्यक्तींची नावे काळ्या यादीत टाकण्यात आली होती. विविध सुरक्षा यंत्रणांनी ही यादी तयार केली असून, या यादीतील व्यक्तींना भारतात प्रवास करण्यास बंदी घालण्यात आली आहे. मात्र, आता ही काळी यादी रद्द करण्याचा विद्यमान केंद्र सरकारचा विचार असल्याचे राम माधव यांनी स्पष्ट केले. अमेरिकेतील शिख नेत्यांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. 

ही काळी यादी जवळजवळ रद्द करण्यात आलेली आहे. या यादीत काही नावे अद्याप शिल्लक असून, ती नावेही लवकरच काढून टाकण्यात येतील. त्यामुळे शिख समुदायाच्या काळ्या यादीत टाकण्यात आलेल्या व्यक्तीही लवकरच भारतात प्रवास करू शकतील, असा दावा राम माधव यांनी केला. 

Web Title: Black list of Sikh people will be canceled says Ram Madhav