काकांचा आजार दूर व्हावा, म्हणून 10 वर्षाच्या पुतणीचा बळी!

वृत्तसंस्था
मंगळवार, 7 मार्च 2017

एका पोत्यामध्ये लिंबू, हळद आणि केसांसोबत आएशाचा मृतदेह सापडला. हा प्रकार नरबळीचा असावा अशी पोलिसांनी शक्‍यता वर्तविली आहे. "आएशाची निर्घृणपणे हत्या करण्यात आली असून आम्हाला हा प्रकार काळ्या जादूच्या वाटत आहे. आम्ही सर्व दृष्टीने चौकशी करत आहोत', अशी माहिती मागाडी पोलिसांनी दिली.

मागाडी - काकांचा आजार बरा व्हावा म्हणून दहा वर्षांच्या पुतणीचा बळी दिल्याची धक्‍कादायक घटना समोर आली आहे. काळ्या जादूच्या प्रभावाखाली रामनगरम जिल्ह्यात घडलेल्या या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत चार जणांना ताब्यात घेतले आहे.

कर्नाटकमधील रामनगरम जिल्ह्यातील मागाडी येथे चौथ्या वर्गात शिकणाऱ्या आएशा नावाची मुलगी हरवली होती. होसाहली जवळील एका मशिदीजवळ तीन मार्च रोजी पोलिसांना तिचा मृतदेह सापडला. एका पोत्यामध्ये लिंबू, हळद आणि केसांसोबत आएशाचा मृतदेह सापडला. हा प्रकार नरबळीचा असावा अशी पोलिसांनी शक्‍यता वर्तविली आहे. "आएशाची निर्घृणपणे हत्या करण्यात आली असून आम्हाला हा प्रकार काळ्या जादूच्या वाटत आहे. आम्ही सर्व दृष्टीने चौकशी करत आहोत', अशी माहिती मागाडी पोलिसांनी दिली. आएशाचे वडिल मोहम्मद नुरुल्ला गुलाम यांनी दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी मृत मुलीचे काका मोहम्मद वसील (वय 42), बंगळूरमधील मशिदीतील सदस्य रशीदुनीस्सा (वय 38), नसीम ताज (वय 33) आणि एका अल्पवयीनाला खुनाच्या आरोखाली अटक केले आहे. प्राथमिक माहितीनुसार हा प्रकार म्हणजे संपत्तीच्या वादातून झाल्याचे दिसून येत आहे.

नसीमच्या सल्ल्यावरून वसीलने पक्षाघाताने त्रस्त असलेल्या त्याच्या भावाला बरे वाटावे म्हणून आएशाचा बळी देण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर एक मार्च रोजी शाळेतून घरी येताना आएशाचे अपहरण करण्यात आले. त्यानंतर आएशाचा गळा कापून खून करण्यात आला. सविस्तर चौकशीनंतर वसीलने आपला गुन्हा कबूल केला.

Web Title: Black magic claims one precious life again: 10-year-old Bengaluru girl 'sacrificed' to 'cure' sick uncle