देशात 3 हजार 185 कोटींचा काळा पैसा उघड

वृत्तसंस्था
बुधवार, 21 डिसेंबर 2016

नवी दिल्ली  : देशभरात नोटाबंदीनंतर काळ्या पैशाविरोधात सुरू झालेल्या कारवाईत 3 हजार 185 कोटी रुपयांचा काळा पैसा 19 डिसेंबरपर्यंत उघड झाला आहे. या कारवाईत प्राप्तिकर विभागाने 86 कोटी रुपयांच्या नव्या नोटा जप्त केल्या आहेत.

नवी दिल्ली  : देशभरात नोटाबंदीनंतर काळ्या पैशाविरोधात सुरू झालेल्या कारवाईत 3 हजार 185 कोटी रुपयांचा काळा पैसा 19 डिसेंबरपर्यंत उघड झाला आहे. या कारवाईत प्राप्तिकर विभागाने 86 कोटी रुपयांच्या नव्या नोटा जप्त केल्या आहेत.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पाचशे व हजारच्या नोटा बंद झाल्यानंतर प्राप्तिकर विभागाने देशभरात 677 ठिकाणी छापे टाकले. कर चुकवेगिरी आणि हवाला व्यवहारप्रकरणी प्राप्तिकर विभागाने 3 हजार 100 नोटिसा बजावल्या आहेत. या कारवाईत रोकड व सोने असा 428 कोटी रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. यात 86 कोटी रुपयांच्या नव्या नोटा जप्त करण्यात आल्या असून, यामध्ये प्रामुख्याने दोन हजार रुपयांच्या नव्या नोटांचा समावेश आहे. प्राप्तिकर विभागाने 19 डिसेंबरपर्यंत 3 हजार 185 कोटी रुपयांची बेहिशेबी मालमत्ता उघड केली आहे.
केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीडीटी) देशभरातील कर यंत्रणा, रिझर्व्ह बॅंक आणि अन्य बॅंकांना कर चुकवेगिरी प्रकरणांच्या तपासात सहभागी करून घेतले आहे. देशातील सर्व यंत्रणांनी नव्या नोटांच्या स्वरुपातील जप्त केलली रोकड स्वत:कडे न ठेवता बॅंकांमध्ये ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यामुळे या नव्या जप्त नोटा पुन्हा वितरणात येण्यास मदत होणार आहे. तसेच, काळा पैसा लपवून ठेवण्यासाठी अवलंबण्यात येत असलेल्या मार्गांचा शोध घेण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत.

. . . . . .

Web Title: black money exposed