एनडीएच्या काळात 80 टक्के काळा पैशात घट

वृत्तसंस्था
मंगळवार, 24 जुलै 2018

स्विस बँकेतील या आकड्यांचा उल्लेख राज्यसभेतही करण्यात आला आहे. स्विस बँकेत असलेला भारतीयांचा पैसा हा देशातील विविध भागांतून जमा झालेला आहे. त्यात सर्वच काळा पैसा नाही.

नवी दिल्ली : स्विस बँकेत जमा असलेला सर्वच पैसा काळा नाही. राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (एनडीए) कार्यकाळात काळा पैशांमध्ये 80 टक्के कपात झाली आहे. याशिवाय नॉन-बँक कर्ज आणि ठेवी काही प्रमाणात कमी झाल्याची बाब स्विस बँकेच्या 'डाटा बँक ऑफ इंटरनॅशनल सेटलमेंट्स'च्या अहवालातून समोर आली आहे. 

मागील वर्षी 2017 मध्ये काळा पैशात 34.5 टक्के घट झाल्याची नोंद आहे. 2016 मध्ये नॉन-बँक कर्जाचा आकडा 80 कोटी डॉलर इतका होता. आता 2017 ला यामध्ये घट झाली असून, हा आकडा 52.4 कोटी डॉलरवर गेला आहे. याशिवाय 'स्विस नॉन बँक कर्ज' आणि ठेवींमध्ये मोठ्या प्रमाणात कपात झाली आहे. 2013 पासून ते 2017 पर्यंत यामध्ये 80 टक्के कमी नोंदवण्यात आली आहे.

दरम्यान, स्विस बँकेतील या आकड्यांचा उल्लेख राज्यसभेतही करण्यात आला आहे. स्विस बँकेत असलेला भारतीयांचा पैसा हा देशातील विविध भागांतून जमा झालेला आहे. त्यात सर्वच काळा पैसा नाही.

Web Title: Black Money is Reduced in NDA Government