न्यायालयाने अखेर निकाल राखून ठेवला 

पीटीआय
शनिवार, 7 एप्रिल 2018

जयपूर - बहुचर्चित काळवीट शिकार प्रकरणामध्ये सिनेअभिनेता सलमान खानला आजही जामीन मिळू शकला नाही. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर जिल्हा आणि सत्र न्यायाधीश रवींद्रकुमार जोशी यांनी आपला निर्णय उद्या (ता.7) पर्यंत राखून ठेवल्याने सलमानला आजची रात्रही तुरुंगामध्येच काढावी लागणार आहे. तत्पूर्वी जोधपूरमधील न्यायालयाने गुरुवारी सलमानला 5 वर्षांचा कारावास आणि 10 हजार रुपयांचा दंड ठोठावला होता. न्यायालयामध्ये सलमानची बाजू मांडणारे वकील हस्तीमल सारस्वत आणि महेश बोडा यांनी कमकुवत पुरावे आणि अशिलाच्या चांगल्या चारित्र्याचा दाखला दिला.

जयपूर - बहुचर्चित काळवीट शिकार प्रकरणामध्ये सिनेअभिनेता सलमान खानला आजही जामीन मिळू शकला नाही. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर जिल्हा आणि सत्र न्यायाधीश रवींद्रकुमार जोशी यांनी आपला निर्णय उद्या (ता.7) पर्यंत राखून ठेवल्याने सलमानला आजची रात्रही तुरुंगामध्येच काढावी लागणार आहे. तत्पूर्वी जोधपूरमधील न्यायालयाने गुरुवारी सलमानला 5 वर्षांचा कारावास आणि 10 हजार रुपयांचा दंड ठोठावला होता. न्यायालयामध्ये सलमानची बाजू मांडणारे वकील हस्तीमल सारस्वत आणि महेश बोडा यांनी कमकुवत पुरावे आणि अशिलाच्या चांगल्या चारित्र्याचा दाखला दिला. या दोन घटकांच्या आधारे सलमानला जामीन मंजूर केला जावा, अशी विनंती त्यांनी न्यायालयाकडे केली. दुसऱ्या बाजूला सरकारी वकील पोकर राम यांनी सलमानच्या जामिनाला विरोध केला. सलमानला जामीन मंजूर केला तर सर्वसामान्य लोकांवर याचा वाईट परिणाम होईल. सलमानचे कृत्य पाहता त्याला दयामाया दाखविता येणार नाही, यामुळे त्याला जामीन दिला जाऊ नये, असा दावा त्यांनी केला. या खटल्यातील पुरावे भक्कम असल्याने यावर घाईमध्ये निर्णय घेता येणार नाही, असे सांगत न्यायाधीशांनी यावरील निकाल राखून ठेवला. 

सलमानच्या वकिलांना धमक्‍या 
आज झालेल्या सुनावणीस सलमान खानच्या दोन्ही बहिणी उपस्थित होत्या, सलमानचे वकील महेश बोडा यांनी आपल्याला जिवे मारण्याच्या धमक्‍या दिल्या जात असल्याचा दावा केला. धमक्‍यानंतरही आपण सलमानची बाजू न्यायालयात मांडू, असे त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. विशेष म्हणजे आज अभिनेत्री प्रीती झिंटानेही सलमानची जोधपूरला जाऊन भेट घेतली. 

Web Title: Blackbuck case Salman Khan court finally stayed the case