कलम '35अ'वरून केंद्राला ब्लॅकमेल करण्याचा डाव 

कलम '35अ'वरून केंद्राला ब्लॅकमेल करण्याचा डाव 

श्रीनगर : "जम्मू-काश्‍मीरमधील राजसत्तेच्या संकल्पनेला धोका निर्माण होण्याची भीती असल्यानेच पीपल्स डेमॉक्रॅटिक पार्टी (पीडीपी) व नॅशनल कॉन्फरन्स पक्ष घटनेतील कलम "35अ'च्या वापरावरून केंद्र सरकारला "ब्लॅकमेल' करीत आहेत,'' अशी टीका भारतीय जनता पक्षाने बुधवारी केली. 

जम्मू-काश्‍मीरमधील विधानसभेसारख्या लोकशाही संस्थेचा भाजप अवमान करीत असल्याची टीका माजी अर्थ मंत्री व "पीडीपी'चे नेते अल्ताफ बुखारी यांनी केली होती. भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस राम माधव यांना याची पूर्ण कल्पना असल्याचेही त्यांनी म्हटले होते. याला उत्तर देताना पक्षाचे राज्यातील प्रवक्ते खालिद जहांगीर यांनी "पीडीपी' व नॅशनल कॉन्फरन्स पक्षाने भाषणबाजीपेक्षा आत्मपरीक्षण करावे,' असा सल्ला दिला.

2017 मध्ये श्रीनगरच्या जागेसाठी झालेल्या लोकसभा निवडणुकीत हे दोन्ही पक्षांना एकत्रित 10 टक्‍क्‍यांपेक्षा कमी मते मिळाली आहेत. यावरून जनतेची मते मिळविण्यासाठी या दोन्ही पक्षांचा जनतेवरील राजकीय प्रभाव दहा टक्‍क्‍यांपेक्षा कमी आहे. राज्यातील हे परंपरागत पक्ष आत्मपरीक्षण न करता निवडणूक व अन्य विषयांची सरमिसळ करीत जनतेची दिशाभूल करीत आहेत, दुर्दैवी आहे, असे जहांगीर म्हणाले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com