जयललितांच्या बदनामीचा कमल हसन यांच्यावर आरोप 

पीटीआय
शुक्रवार, 3 ऑगस्ट 2018

चेन्नई (पीटीआय) : ज्येष्ठ अभिनते कमल हसन सूत्रसंचालन करीत असलेला "बिग बॉस'च्या तमीळ आवृत्तीचा दुसरा हंगाम वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. या रिऍलटी शोमध्ये तमिळनाडूच्या दिवंगत मुख्यमंत्री जे. जयललिता यांचे चित्रण हुकूमशहा असे करून त्यांचा अपमान केल्याचा आरोप एका महिला वकिलाने केला आहे. तमीळ "बिग बॉस'वर बंदी आणावी, यासाठी तिने पोलिसांकडे तक्रार दिली आहे. 

वकील लुईसल रमेश यांनी तक्रारीत कमल हसन यांच्यावर टीका केली आहे. मक्कल निधी मैय्यम पक्षाचे संस्थापक असलेले कमल हसन हे या कार्यक्रमाचा वापर त्यांच्या राजकीय वाटचालीसाठी करीत आहेत. कार्यक्रमात कमल हसन यांनी जयललिता यांच्याविषयी बोलताना तुच्छतापूर्वक भाषा वापरली, असा आरोप लुईसल यांनी केला आहे. जयललिता यांची बदनामी करण्याच्या हेतूने अम्मांची प्रतिमा "बिग बॉस'मधून हुकूमशहा अशी रंगविण्यात हसन व निर्मात्या कंपनीचा हात असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. 

Web Title: blame on Kamal hassan for Slander Jaylalita