एसी डब्यातील ब्लँकेटस् आता दोन वर्षेच वापरणार !

वृत्तसंस्था
मंगळवार, 26 जून 2018

ब्लँकेटस् धुण्याच्या प्रमाणात वाढ करण्यासाठी त्यादृष्टीने प्रयत्न केले जात आहेत. रेल्वेच्या एसी डब्यामध्ये यापूर्वी ज्या ब्लँकेटस् दिल्या जात होत्या. त्या चार वर्षांपर्यंत वापरण्यात येत असे. मात्र, आता त्या वापण्यावरही मर्यादा ठेवण्यात आली आहे. आता या ब्लँकेटस् फक्त दोन वर्षांपर्यंत वापरता येऊ शकतील.

नवी दिल्ली : रेल्वेप्रवाशांना वातानुकूलित (एसी) डब्यामध्ये झोपण्यासाठी ब्लँकेटस् दिली जातात. या ब्लँकेटबाबत आता रेल्वेप्रशासनाने नवा आदेश जारी केला आहे. एसी डब्यामध्ये दिले जाणारे ब्लँकेटस् महिन्यातून दोनदा धुण्यात यावेत, असे सांगण्यात आले आहे. तसेच ब्लँकेटस् धुण्यासारखे बनविण्यात यावेत, असेही रेल्वे प्रशासनाने सांगितले.

Blankets

ब्लँकेटस् धुण्याच्या प्रमाणात वाढ करण्यासाठी त्यादृष्टीने प्रयत्न केले जात आहेत. रेल्वेच्या एसी डब्यामध्ये यापूर्वी ज्या ब्लँकेटस् दिल्या जात होत्या. त्या चार वर्षांपर्यंत वापरण्यात येत असे. मात्र, आता त्या वापण्यावरही मर्यादा ठेवण्यात आली आहे. आता या ब्लँकेटस् फक्त दोन वर्षांपर्यंत वापरता येऊ शकतील. तसेच या ब्लँकेटस् सध्याच्या किमतीपेक्षा दुप्पट किमतीमध्ये मिळणार आहेत. नव्या ब्लँकेटस् वुलन आणि नायलॉनच्या असणार आहेत. त्यामुळेच सध्याच्या ब्लँकेटच्या किमतीपेक्षा या ब्लँकेटच्या किमतीत वाढ करण्यात आली आहे. 

सध्या वुलन ब्लँकेटस् 400 रुपयांपर्यंत मिळत आहेत. मात्र, या ब्लँकेटच्या नव्या किमती ठरवण्याच्या तयारी सुरु करण्यात आली, असे रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. 

Web Title: Blankets for AC travellers to be washed twice a month instead of once in two months