West Bengal Factory Blast: फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट, तीन जणांचा मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

West Bengal Factory Blast

West Bengal Factory Blast: फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट, तीन जणांचा मृत्यू

पश्चिम बंगालमधील पूर्व मेदिनीपूर जिल्ह्यातील एग्रा येथे मंगळवारी एका कारखान्यात स्फोट झाला. या स्फोटामध्ये तीन जणांचा मृत्यू झाला असून चार जण जखमी झाले आहेत. पोलिसांनी ही माहिती दिली. हा स्फोट एका अवैध फटाका कारखान्यात झाला. स्फोटानंतर घटनास्थळावरून धुराचे लोट दिसत होते.Latest Marathi News

स्फोटात जखमी झालेल्या लोकांना स्थानिक नागरिकांनी मदत करून रूग्णालयात दाखल केले. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या महिन्यात या कारखान्यावर छापा टाकून मालकावर कारवाई करण्यात आली होती. कारवाई होऊनही येथे अनाधिकृत फटाके बनवले जात होते.

कारखान्यातील स्फोटावर भाजप नेत्याने प्रतिक्रिया दिली ते म्हणाले, पश्चिम बंगालमधील उद्योगाचा विचार केला तर सर्वत्र बॉम्बचे कारखाने आहेत, कारण जेव्हा जेव्हा स्फोट होतो तेव्हा प्रथम फटाक्यांच्या कारखान्यातच स्फोट झाल्याचे कळते.

स्फोट झालेल्या कारखाण्याचे संबंध अल-कायदासारख्या विविध दहशतवादी संघटनांशी असल्याचे कळते. Marathi Tajya Batmya