MI Note चा स्फोट; पती-पत्नी जखमी

वृत्तसंस्था
शुक्रवार, 28 डिसेंबर 2018

नवी दिल्ली : शहापूरमधील कासार आळीत MI कंपनीच्या Note 5 या मोबाईल फोनच्या बॅटरीचा स्फोट झाला. त्यामुळे येथील एका घराला आग लागली. या आगीत पती-पत्नीसह दोन लहान मुले जखमी झाले आहेत. यामध्ये हे दोघे 35 टक्के भाजले आहेत.

राजू शिंदे आणि रोशनी शिंदे असे या दाम्पत्याचे नाव असून, दोघेही भाजले आहेत. तर त्यांची दोन लहान मुले यामध्ये किरकोळ जखमी झाले आहेत. शिंदे कुटुंबिय कासार आळीतील प्रतीक्षा अपार्टमेंट येथे राहत आहे. राजेश शिंदे यांनी त्यांचा मोबाईल काल (शुक्रवार) सकाळी चार्जिंगला लावला होता. त्यानंतर ते पुन्हा झोपी गेले होते. काही वेळानंतर बॅटरीचा अचानक स्फोट झाला. या स्फोटानंतर आग लागली. या आगीत राजू आणि रोशनी हे जखमी झाले. 

दरम्यान, या स्फोटाचा मोठा आवाज झाल्याने सोसायटीतील इतर रहिवासी आणि शेजारील लोक मदतीसाठी शिंदे कुटुंबियांच्या घराच्या दिशेने पळाले.

Web Title: Blast of MI Note Mobile Phone two injured