पवई तलावात बोट बुडाली; तीन जण बेपत्ता

वृत्तसंस्था
शनिवार, 24 डिसेंबर 2016

मुंबई: पवई येथील तलावात शुक्रवारी रात्री बोट बुडून झालेल्या अपघातात तीन जण बेपत्ता झाले असून पाच जणांना वाचविण्यात यश आले आहे.

'बोट रात्री सव्वा अकरा वाजता बुडाली. नियंत्रण कक्षाला रात्री साडे अकरा वाजता बोट बुडाल्याचा कॉल आला. त्यापैकी काही जणांना स्थानिकांनी वाचविले आहे तर काही जण पाण्यात बुडाले', अशी माहिती पवई पोलिस स्थानकातील पोलिस अधिकाऱ्याने दिली.

बोटीवर असलेले सगळेजण हे मुंबई येथील रहिवासी आहेत. ते निवांत वेळ घालविण्यासाठी तलावातील बोटीवर आले होते. पाण्यात आलेल्या अडथळ्यामुळे बोट उलटली असण्याची शक्‍यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. बुडालेली बोट ही तलावाजवळील एका क्‍लबच्या सदस्याची होती. मात्र, ही बोट कोणत्याही परवानगीशिवाय घेतली असल्याचा दावा क्‍लबमधील अधिकाऱ्यांनी केला आहे. काठापासून केवळ 100 मीटर अंतरावर असतानाच बोट बुडाल्याने काठावरील लोक त्यांच्या मदतीसाठी धावून आले आणि पाच जणांना वाचविण्यात यश मिळाले.

Web Title: Boat capsized; three peoples missed