बोधगया मंदिरात सापडले 2 जिवंत बॉम्ब

वृत्तसंस्था
शनिवार, 20 जानेवारी 2018

बौद्ध धर्मगुरु दलाई लामा शहरात असताना ही दोन बॉम्ब सापडल्याने खळबळ उडाली आहे. मंदिराच्या परिसरात हे दोन बॉम्ब सापडले आहेत. शुक्रवारी रात्री राबविण्यात आलेल्या शोधमोहिमेत हे दोन बॉम्ब सापडले आहेत.

पाटणा : भगवान बुद्ध यांच्या बोधगया मंदिरात पुन्हा एकदा घातपाताचा कट उघडकीस आला असून, मंदिरात दोन जिवंत बॉम्ब सापडले आहेत. 

बौद्ध धर्मगुरु दलाई लामा शहरात असताना ही दोन बॉम्ब सापडल्याने खळबळ उडाली आहे. मंदिराच्या परिसरात हे दोन बॉम्ब सापडले आहेत. शुक्रवारी रात्री राबविण्यात आलेल्या शोधमोहिमेत हे दोन बॉम्ब सापडले आहेत. दोन्ही बॉम्ब फल्गु नदीच्या किनाऱ्यावर नष्ट करण्यात येणार आहेत. 

महोबोधी मंदिराच्या गेट नंबर चार जवळ हे दोन बॉम्ब सापडले आहेत. दलाई लामा हे सध्या बोधगयामध्ये उपस्थित आहेत. दोन जानेवारीपासून महाबोधी मंदिरात सुरु असलेल्या पूजेतही ते सहभागी झालेले आहेत. त्यांच्या उपस्थितीत जिवंत बॉम्ब सापडणे, हे सुरक्षेच्या दृष्टीने धोकादायक मानले जात आहे.

Web Title: bodhgaya mahabodhi temple two bomb found dalai lama visit