गंगेत किती मृतदेह आढळले किंवा पुरले?; माहिती देण्याचे NGT चे आदेश

गंगेतील तरंगणाऱ्या मृतदेहांप्रकरणाची राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने गंभीर दखल घेतली आहे.
गंगेत किती मृतदेह आढळले किंवा पुरले?; माहिती देण्याचे NGT चे आदेश

लखनऊ : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) आणि बिहारमधील (Bihar) गंगा नदीत तरंगणाऱ्या (Ganga River) मृतदेहांच्या प्रकरणाची राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने (NGT) गंभीर दखल घेतली आहे. तसेच 31 मार्चपर्यंत गंगेत तरंगणाऱ्या आणि नदीच्या काठावर दफन करण्यात आलेल्या मृतदेहांची संख्या नेमकी किती हे सांगण्याचे आदेश उत्तर प्रदेश आणि बिहार या दोन राज्यांना दिले आहेत. (NGT On Human Corpses In Ganga River)

गंगेत किती मृतदेह आढळले किंवा पुरले?; माहिती देण्याचे NGT चे आदेश
श्रीलंकेत पेट्रोल संपले; एअरलाईन्सच्या खासगीकरणाचा प्रस्ताव

तसेच, याबाबत यूपी आणि बिहारच्या अतिरिक्त मुख्य सचिव (गृह) आणि अतिरिक्त मुख्य सचिव, प्रधान सचिवांना (आरोग्य) तथ्यात्मक पडताळणी अहवाल सादर करण्यास सांगण्यात आले आहे. न्यायमूर्ती अरुण कुमार त्यागी आणि तज्ज्ञ सदस्य डॉ. अफरोज अहमद यांच्या खंडपीठाने हे आदेश दिले आहेत. 2018 आणि 2019 मध्ये कोविड-19 सुरू होण्यापूर्वी आणि 2020, 2021 मध्ये कोविड-19 महामारी सुरू झाल्यानंतर आणि 31 मार्चपर्यंत किती मानवी मृतदेह यूपी आणि बिहारच्या गंगा नदीत तरंगताना दिसले आणि किती नदी किनारी पुरण्यात आले याबाबत विचारणा करण्यात आली आहे.

गंगेत किती मृतदेह आढळले किंवा पुरले?; माहिती देण्याचे NGT चे आदेश
'गंगेत वाहणारे मृतदेह भारताचे नव्हेत तर नायजेरियाचे'...

तसेच, उत्तर प्रदेश आणि बिहारच्या सरकारने किती प्रकरणांमध्ये मृतदेहांवर अंत्यसंस्कार किंवा दफन करण्यासाठी आर्थिक मदत केली? याबरोबर गंगा नदीत मृतदेह वाहून जाणे किंवा नदीच्या काठावर मृतदेहांचे दफन करणे थांबवण्यासाठी जनजागृती आणि लोकसहभाग वाढवण्यासाठी कोणती पावले उचलली? असे प्रश्नदेखील उपस्थित केले आहेत. याशिवाय मृतदेह हाताळण्याच्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केल्याबद्दल एखाद्या व्यक्तीविरुद्ध खटला चालवला गेला आहे का? असा प्रश्नदेखील खंडपीठाने विचारला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com