राष्ट्रपती भवनाच्या कर्मचारी कक्षात आढळला मृतदेह

वृत्तसंस्था
शुक्रवार, 8 जून 2018

अत्यंत कडक सुरक्षा व्यवस्था तैनात असलेल्या राष्ट्रपती भवनाच्या कर्मचारी कक्षात एका व्यक्तीचा मृतदेह आढळला. मृत व्यक्ती राष्ट्रपती सचिवालयात चतुर्थ श्रेणी कर्मचारी असल्याची माहिती पोलिसांनी दिली. 

नवी दिल्ली : अत्यंत कडक सुरक्षा व्यवस्था तैनात असलेल्या राष्ट्रपती भवनाच्या कर्मचारी कक्षात एका व्यक्तीचा मृतदेह आढळला. मृत व्यक्ती राष्ट्रपती सचिवालयात चतुर्थ श्रेणी कर्मचारी असल्याची माहिती पोलिसांनी दिली. 

died hand

राष्ट्रपती सचिवालयातील चतुर्थ श्रेणी कर्मचारी असलेली व्यक्ती काही काळासाठी अस्वस्थ होती. त्यानंतर त्याचा मृतदेह राष्ट्रपती भवनाच्या कर्मचारी कक्षात आढळला. या कक्षातून मोठ्या प्रमाणात दुर्गंधी येत होती. त्यानंतर येथील इतर कर्मचाऱ्यांनी याबाबतची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र, पोलिसांना दरवाजा आतून बंद असल्याचे दिसले. या व्यक्तीचा मृतदेह गेल्या दोन-तीन दिवसांपासून खोलीमध्ये असल्याचे समोर आले. 

दरम्यान, मृत व्यक्तीचे नाव आणि अधिक माहिती अद्याप समजू शकली नाही. मात्र, पोलिस याप्रकरणाचा तपास करत आहेत.

Web Title: Body of man found in Rashtrapati Bhavan servant quarters