बोगस पदवीप्रकरणी उपनिरीक्षकविरुद्ध गुन्हा दाखल  

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 11 एप्रिल 2019

गोवा पोलिस सेवेत उपनिरीक्षक पदासाठी बोगस पदवी प्रमाणपत्र व गुणवत्ता प्रमाणपत्र सादर केल्याप्रकरणी उपनिरीक्षक रितेश फळदेसाई याच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

पणजी (गोवा) : गोवा पोलिस सेवेत उपनिरीक्षक पदासाठी बोगस पदवी प्रमाणपत्र व गुणवत्ता प्रमाणपत्र सादर केल्याप्रकरणी उपनिरीक्षक रितेश फळदेसाई याच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

पोलिस अधीक्षक शेखर प्रभुदेसाई यांनी पणजी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. उपनिरीक्षक रितेश फळदेसाई यांनी उपनिरीक्षक पदासाठी सादर केलेली बोगस पदवी व गुणवत्ता प्रमाणपत्र झांसी - उत्तरप्रदेश येथील बुंदलखंड विद्यापीठाची सादर केले होते. या प्रमाणपत्राच्या तपासणीवेळी ते बोगस असल्याची माहिती विद्यापीठाने पोलिस खात्याला पाठवली आहे. त्याच्या आधारावर ही तक्रार दाखल करण्यात आल्याचे  अधीक्षक प्रभुदेसाई यांनी सांगितले.

Web Title: In the bogus degree case the accused filed a complaint against the sub-inspector

टॅग्स