सलमानला रात्रभर लागली नाही झोप

वृत्तसंस्था
गुरुवार, 5 एप्रिल 2018

जोधपूर येथील ताज पॅलेस हॉटेलमध्ये सलमान खान त्याच्या कुटुंबीयांसह थांबला. त्यावेळी तो अत्यंत चिंतेत होता. याप्रकरणी न्यायालयाकडून काय शिक्षा सुनावली जाते, याबाबत सलमान खान निराश होता.

जोधपूर : काळविट शिकारप्रकरणाची सुनावणी आज (गुरुवारी) पूर्ण झाली. यामध्ये अभिनेता सलमान खानला जोधपूर न्यायालयाने दोषी ठरवले असून, अन्य काही जणांची निर्दोष मुक्तता करण्यात आली. मात्र, याप्रकरणाच्या सुनावणीपूर्वी सलमान खान अत्यंत चिंतेत होता. त्याला रात्रभर झोपही लागली नाही. त्यामुळे रात्रभर तो स्विमिंग पुलाच्या किनाऱ्यावर बसला होता. 

Salman Khan

काळविट शिकारप्रकरणाच्या सुनावणीसाठी सलमान खान त्याच्या कुटुंबीयांसह काल (बुधवार) जोधपूर येथे पोचला. जोधपूर येथील ताज पॅलेस हॉटेलमध्ये सलमान खान त्याच्या कुटुंबीयांसह थांबला. त्यावेळी तो अत्यंत चिंतेत होता. याप्रकरणी न्यायालयाकडून काय शिक्षा सुनावली जाते, याबाबत सलमान खान निराश होता. रात्री 12 वाजता सलमान खान जिमला गेला होता. जिमहून परतल्यानंतर एका हॉटेलात थांबून त्याने स्विमिंग केले. त्यादरम्यान सलमानच्या चेहऱ्यावर निराशा जाणवत होती. त्याचे कुटुंबीय झोपायला गेले. मात्र, सलमान तसाच स्विमिंग पुलावर उभा होता. निकालाच्या चिंतेमुळे त्याला झोपही नीट लागली नाही. मात्र, रात्री 3 ते 4 च्या सुमारास तो झोपायला गेल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान, काळविट शिकारप्रकरणी अभिनेत्री तब्बू, नीलम, सोनाली आणि अभिनेता सैफी अली खानची न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता करण्यात आली असून, तत्पूर्वी सलमान खानने त्याच्यावरील सर्व आरोप फेटाळले होते.

Web Title: Bollywood Actor Salman Khan felt uneasy before verdict