बॉलिवूडच्या अभिनेत्रींचे बहिष्कारास्त्र 

बॉलिवूडच्या अभिनेत्रींचे बहिष्कारास्त्र 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतातील #MeToo मोहिमेची सुरवात बॉलिवूडपासून झाल्यानंतर त्याचा सर्वाधिक फटकाही बॉलिवूडमधील मोठ्या कलावंतांना बसला आहे. #MeToo मोहिमेमुळे सिनेसृष्टीतील अनेक दिग्गजांच्या चेहऱ्यांवरील बुरखे फाडल्यानंतर कोंकणा सेन-शर्मा, नंदिता दास, मेघना गुलझार, गौरी शिंदे, किरण राव, रिमा कागती आणि झोया अख्तर या दिग्गज अभिनेत्रींनी कलंकित चेहऱ्यांसोबत काम न करण्याचा निर्णय घेतला आहे. या सर्वजणींनी #MeToo कॅम्पेनचे समर्थन करत आरोप झालेल्यांच्या विरोधात बहिष्कारास्त्र उगारले आहे. 

विनोद दुआ आरोपीच्या पिंजऱ्यात 
ज्येष्ठ पत्रकार विनोद दुआ यांच्यावरदेखील आज निष्ठा जैन या महिला पत्रकाराने लैंगिक शोषणाचे आरोप केले आहेत. फेसबुक पेजवर आज एक सविस्तर पोस्ट लिहिताना निष्ठा जैन यांनी मुलाखतीच्या वेळी दुआ यांनी आपल्यासोबत अश्‍लील विनोद केल्याचे म्हटले आहे. 
 
सुभाष घईंविरोधात तक्रार 
बॉलिवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक सुभाष घई यांच्याविरोधात अभिनेत्री आणि मॉडलने लैंगिक शोषणप्रकरणी वर्सोवा पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविली आहे. लेखी तक्रारीनंतर पोलिसांनी चौकशी प्रक्रिया गतिमान केली आहे. घई यांनी ऑगस्ट महिन्यात बळजबरीने आपल्याला त्यांच्या घरी बोलाविले होते, या वेळी त्यांनी आपले चुंबन घेण्याचा प्रयत्न केल्याचे या अभिनेत्रीने म्हटले आहे. 

महिलांसाठी वेगळे ई-मेल अकाउंट 
राज्यातील महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या घटना लक्षात घेऊन दिल्ली महिला आयोगाने खास महिलांना तक्रारी करणे शक्‍य व्हावे म्हणून वेगळे ई-मेल अकाउंट तयार केले आहे. पीडित महिला आता metoodcw@gmail.com या मेलवर तक्रारी मांडू शकतात किंवा त्या 181 क्रमांकावर कॉल करू शकतात, असे आयोगाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे. 

25 वर्षांपूर्वी छळवणुकीला सामोरे जावे लागले होते, अर्थात तो छळ हा लैंगिक शोषण नव्हता. त्या प्रसंगाचा मला आजही राग येतो. महिलांचा छळ करणाऱ्यांना त्याची किंमत मोजावीच लागेल. 
- सैफ अली खान, अभिनेता 

साजिद खानची चित्रपटाच्या सेटवरील महिलांसोबतची वर्तणूक नेहमीच आक्षेपार्ह होती. यावरून ईशा गुप्ताचे त्याच्यासोबत वाद देखील झाले होते. 
- बिपाशा बसू, अभिनेत्री 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com